शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर तालुक्याच्या आठवडी बाजारात खरेदीसाठी झुंबड; नागरिक बेफिकीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 02:01 IST

आदिवासी परिसरातही कोरोना पसरु लागला हातपाय

जनार्दन भेरेभातसानगर : शहापूर तालुक्यात कोरोनाची जणू कुणाला भीतीच राहिली नसल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. सरकारने काही निर्बंध घातले असले तरी याची कुठेही काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. लॉनवर होणारी लग्न गेल्या काही दिवसापासून बंद असली तरीसुद्धा घराजवळची लग्न मात्र मोठ्या थाटामाटात, गर्दीत होत आहेत. जणू काही आपल्याला कोरोना होणारच नाही अशा रुबाबात मंडळी पाहावयास मिळतात. मागील काळात आदिवासींपासून दूर असलेला कोरोना आता पाय पसरू लागला आहे. त्यातच आदिवासी  समाजातही लग्नकार्यात तसेच अंत्यसंस्काराच्या वेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करीत आहेत. 

आम्ही सकाळपासून उन्हात असतो त्यामुळे आम्हाला कोरोना होणार नाही असा त्यांना विश्वास आहे. मात्र आज तालुक्यामध्ये कोरोनासाठी लग्न समारंभ, आठवडी बाजार, बस्थानक व बससाठी होणारी गर्दी कोरोनासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास हातभार लागत आहे. मागील महिन्यात केवळ एक ते दोन रुग्ण सापडत असताना आता ही संख्या २५ च्या वर जात असल्याने ही धोक्याची घंटा नसेल कशावरून? कोरोनात आतापर्यंत १२६ जणांचे मृत्यू झाले आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास तालुक्यामध्ये येत्या काही दिवसात गंभीर चित्र निर्माण होऊ शकते. कोरोना खेड्यापाड्यांमध्ये पोहोचला असून या रुग्णांच्या संपर्कात येणारे अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे तालुक्यामध्ये होणारे लग्नसमारंभ, आठवडीबाजार, वाढदिवस,अंत्यसंस्काराच्या वेळी होणारी गर्दी.  मास्क न वापरता होणारा नागरिकांचा संचार. आठवडी बाजार यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे सध्यातरी दिसत आहेत. शहापूर ,डोळखांब, अघई, शेणवा, कसारा, वासिंदसारख्या मुख्य बाजारपेठा तालुक्यांमध्ये आहेत. येथे आठवडी बाजार भरतात. तालुक्यात नाट्यगृह नसल्याने ही भर इतर कार्यक्रमात भरून निघते. तालुक्यामध्ये आज ना उद्या लॉकडाऊन होईल अशा प्रकारच्या वावड्या उठत असल्याने या आठवडी बाजारमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जर नियमांचे पालन केले नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशी भीतीही व्यक्त केली आहे.

शहापूर तालुक्यात अनेक समारंभ जोरात सुरू असून नागरिक अजिबात या आजाराबद्दल हवे तितके जागृत आहेत असे वाटत नाही. त्यासाठी त्यांनी आताच काळजी घेणे आवश्यक आहे. - जयराम भोईर, सामाजिक कार्यकर्ते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या