शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शॅगीने अटकेपूर्वीच पाठवले कोट्यवधी रुपये विदेशात

By admin | Updated: April 21, 2017 03:21 IST

कॉल सेंटर प्रकरणाचा सूत्रधार सागर ठक्कर ऊर्फ शॅगी याने अटकेपूर्वीच कोट्यवधी रुपये विदेशात पाठवल्याची माहिती पोलिसांना त्याच्या चौकशीदरम्यान मिळाली आहे.

ठाणे : कॉल सेंटर प्रकरणाचा सूत्रधार सागर ठक्कर ऊर्फ शॅगी याने अटकेपूर्वीच कोट्यवधी रुपये विदेशात पाठवल्याची माहिती पोलिसांना त्याच्या चौकशीदरम्यान मिळाली आहे. करवसुलीच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या मीरा रोडमधील बोगस कॉल सेंटर प्रकरणाचा सूत्रधार शॅगी गेले ११ दिवस गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस कोठडीत होता. यादरम्यान पोलिसांनी त्याच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केली. याच उद्देशाने पोलिसांचे एक पथक अहमदाबादलाही गेले होते. शॅगीची देशविदेशातील बँकांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावे खाती असल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले होते. काळा पैसा लपवण्यासाठी त्याने या बनावट कंपन्या स्थापन केल्या होत्या. ८ एप्रिल रोजी भारतात परतल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. परंतु, तत्पूर्वीच त्याने कोट्यवधी रुपयांची विल्हेवाट लावली होती. विदेशातील बँक खात्यांमध्ये त्याने मोठी रक्कम वळती केल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली आहे.शॅगीचे आर्थिक हितसंबंध कुणाकुणाशी होते, त्यांच्याकडून या प्रकरणाची माहिती मिळते का, यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. कॉल सेंटर प्रकरणात आॅक्टोबर २०१६ मध्ये पोलिसांनी जगदीश कनानीला अटक केली होती. पोलीस कारवाईची कुणकुण लागल्याने त्याने आधीच संगणकांच्या हार्डडिस्कची विल्हेवाट लावून पुरावे नष्ट केले होते. कनानी हा देखील काळ्या धंद्यामध्ये मुख्य भूमिकेत होता, अशी माहिती शॅगीने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे कनानीदेखील पुन्हा पोलिसांच्या रडारवर आला आहे. (प्रतिनिधी)