शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बीएसयूपी घरांवर सेनेच्या वर्धापदिनाची छाया

By admin | Updated: June 19, 2017 05:02 IST

डोंबिवलीच्या इंदिरानगरमधील बीएसयूपी योजनेतील पात्र लाभार्थ्यांसह अन्य ठिकाणच्या प्रकल्पांमधील लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे सोमवारी वाटप

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : डोंबिवलीच्या इंदिरानगरमधील बीएसयूपी योजनेतील पात्र लाभार्थ्यांसह अन्य ठिकाणच्या प्रकल्पांमधील लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे सोमवारी वाटप केले जाणार आहे. हा महापालिकेचा कार्यक्रम असताना महापौर राजेंद्र देवळेकर यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रसिध्दीपत्रक काढल्याने मित्रपक्ष भाजपामध्ये नाराजीचे वातावरण आहे. बीएसयुपी लाभार्थ्यांना पालिकेच्या फंडातून घरे मिळत आहेत; शिवसेनेच्या फंडातून नाही अशी टीका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून त्यांनी याप्रकरणी प्रशासनालाही जबाबदार धरले आहे. त्यामुळे सोमवारचा कार्यक्रमात वर्धापनदिनाच्या औचित्याचा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता आहे. बीएसयूपी लाभार्थ्यांना घरे देण्यास विलंब होत असल्याने गुरूवारी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरानगरमधील लाभार्थ्यांनी कुटुंबासह केडीएमसी मुख्यालयावर धडक देत घरे देण्याची मागणी केली होती. त्यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा डोंबिवली विधानसभा संघटक तात्या माने यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या बैठकीत महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सोमवारी कल्याण-डोंबिवली बीएसयूपी योजनेतील लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वाटप केले जाईल, अशी घोषणा केली. इंदिरानगरच्या४८ लाभार्थ्यांना सोमवारी चाव्यांचे वाटप केले जाणार आहे. त्यांच्यासह साठेनगरमधील लाभार्थ्यांना उंबर्डे याठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तेथील बीएसयुपी योजनेतील २४ लाभार्थ्यांनाही त्याचवेळी घरांचा ताबा दिला जाणार आहे, तर कल्याणच्या इंदिरानगरमधील ४० लाभार्थ्यांनाही चाव्या सुपूर्द केल्या जाणार आहेत. सध्या डागडुजीच्या कारणास्तव अत्रे रंगमंदिर बंद ठेवल्याने चाव्यावाटपाचा कार्यक्रम मुख्यालयातील महापालिका भवनातील स्थायी समिती सभागृहात सकाळी ११.३० वाजता पार पडणार आहे. दरम्यान यासंदर्भात महापौर कार्यालयातून सादर झालेल्या प्रसिध्दीपत्रकावरून नवा वाद उभा राहिला आहे. या पत्रकात केवळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. शिवसेनेच्या वर्धापनदिनी म्हणजेच १९ जूनला महापालिका परिसरातील पात्र लाभार्थ्यांना बीएसयूपी प्रकल्पातील सदनिकांचे वाटप, अशा आशयाच्या पत्रावर भाजपाने नाराजी व्यक्त केली आहे. हा कार्यक्रम महापालिकेचा आहे, शिवसेना पक्षाच्या फंडातून लाभार्थ्यांना घरे मिळालेली नाहीत. केंद्र व राज्य तसेच महापालिकेच्या फंडातून बीएसयूपी प्रकल्प साकार झाला आहे. त्यामुळे अशाप्रकारचे प्रसिध्दीपत्रक काढणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी दिली. लाभार्थ्यांना घरे ही मिळालीच पाहिजे यात दुमत नाही. परंतु शिवसेनेने अवलंबलेली पध्दत चुकीची आहे. हा कार्यक्रम महापालिकेकडून होत असून तो शिवसेनेच्या मंचावर होत नाही. त्यामुळे महापालिकेचा पदाधिकारी म्हणून मी संबंधित कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे भोईर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शिवसेनेने घेतलेली भूमिका चुकीची असून प्रशासकीय कार्यक्रमात राजकीय पक्षाचा उल्लेख करणे चुकीचे आहे. शिवसेनेने नेहमीच श्रेय लाटण्याचे काम केले असून याला प्रशासनही तितकेच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे गटनेते वरूण पाटील यांनी दिली.