शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 04:48 IST

मुंब्य्रातील झुडुपामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया सतरा वर्षीय मुलाविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे : येथील एका रिक्षाचालकाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन मुंब्य्रातील झुडुपामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया सतरा वर्षीय मुलाविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला लवकरच ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.या अल्पवयीन मुलीला एका मुलाने खारेगावच्या पारसिक लोकमंडल विद्यालय या ठिकाणी मे २०१७ मध्ये बोलवून घेतले. तिथून त्याच्या मोटारसायकलवर बसवून मुंब्रा येथील मोकळ्या जागेतील झुडुपांमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर, तुझ्या घरी या प्रकाराची माहिती देईल, अशी धमकी देत पुन्हा मोटारसायकलवर बसवून फिरायच्या बहाण्याने वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याने दिलेल्या धमकीमुळे तिने घरातही या प्रकाराची वाच्यता केली नाही. ८ आॅगस्ट २०१७ पर्यंत हा प्रकार सुरूच होता. पोटात दुखत असल्यामुळे तिला ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात ८ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले. त्यानंतर, ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. पुढील उपचारासाठी तिला मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातूनच हा प्रकार थेट कळवा पोलिसांना कळवण्यात आला.अखेर, याप्रकरणी मुलीच्या पालकांनी १३ आॅगस्ट २०१७ रोजी त्या मुलाविरुद्ध मुलीचे अपहरण करणे, लैंगिक अत्याचार करणे तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. संबंधित मुलगा अल्पवयीन असल्यामुळे त्याच्या पालकांना याबाबतची कल्पना देऊन त्याच्यावर कारवाईची नोटीस बजावली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक इरशाद सय्यद यांनी ‘लोकमत’ला दिली.