शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 21:59 IST

येथील एका रिक्षाचालकाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन मुंब्य्रातील झुडुपामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या सतरावर्षीय मुलाविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे, दि.14 - येथील एका रिक्षाचालकाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन मुंब्य्रातील झुडुपामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या सतरावर्षीय मुलाविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला लवकरच ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.या अल्पवयीन मुलीला एका मुलाने खारेगावच्या पारसिक लोकमंडल विद्यालय या ठिकाणी मे २०१७ मध्ये बोलवून घेतले. तिथून त्याच्या मोटारसायकलवर बसवून मुंब्रा येथील मोकळ्या जागेतील झुडुपांमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर, तुझ्या घरी या प्रकाराची माहिती देईल, अशी धमकी देत पुन्हा मोटारसायकलवर बसवून फिरायच्या बहाण्याने वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याने दिलेल्या धमकीमुळे तिने घरातही या प्रकाराची वाच्यता केली नाही. ८ आॅगस्ट २०१७ पर्यंत हा प्रकार सुरूच होता. पोटात दुखत असल्यामुळे तिला ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात ८ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले. त्यानंतर, ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. पुढील उपचारासाठी तिला मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातूनच हा प्रकार थेट कळवा पोलिसांना कळवण्यात आला. अखेर, याप्रकरणी मुलीच्या पालकांनी १३ आॅगस्ट २०१७ रोजी त्या मुलाविरुद्ध मुलीचे अपहरण करणे, लैंगिक अत्याचार करणे तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. संबंधित मुलगा अल्पवयीन असल्यामुळे त्याच्या पालकांना याबाबतची कल्पना देऊन त्याच्यावर कारवाईची नोटीस बजावली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक इरशाद सय्यद यांनी ‘लोकमत’ला दिली.