शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बसचालकाकडून चिमुरड्याचा लैंगिक छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 05:10 IST

बदलापूर येथील गुरुकुल इंटरनॅशनल शाळेत दुसरीमध्ये शिकणा-या एका विद्यार्थ्याचा लैंगिक छळ शाळेच्या बसचालकाने केला आहे.

बदलापूर : बदलापूर येथील गुरुकुल इंटरनॅशनल शाळेत दुसरीमध्ये शिकणा-या एका विद्यार्थ्याचा लैंगिक छळ शाळेच्या बसचालकाने केला आहे. हा प्रकार विद्यार्थ्याने पालकांना सांगितल्यावर त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकालाही या बसचालकाने आपल्या चार साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर बसचालकाच्या विरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.बदलापूरमध्ये राहणारे मंगेश पाटील यांचा मुलगा गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो. शाळेचा बसचालक रवी लवाटे हा बसमधून प्रवास करणाºया पाटील यांच्या मुलासोबत अश्लील चाळे करत होता. हा प्रकार त्या मुलाने आपल्या पालकांना सांगितला. तसेच या भीतीने तो शाळेत जाण्यासाठी घाबरत होता. पाटील यांनी या प्रकाराचा जाब विचारला असता बसचालकाने त्यांच्यावरच हल्ला केला. रवीसोबत त्याच्या इतर बसचालक सहकाºयांनीही पाटील यांना बेदम मारहाण करत दहशत निर्माण केली. या प्रकारानंतर जखमी पाटील यांना उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारानंतर रवीविरोधात लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसचालकाला अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही.दरम्यान, या प्रकरणात माहिती घेतली असता हा प्रकार सहा ते नऊ महिन्यांपूर्वीचा असून या प्रकरणाची तक्रार आल्यावर संबंधित पालकाने विद्यार्थ्याची बसदेखील बदलली होती. बस बदलल्यावरही रवी हा विद्यार्थ्याला रागाने पाहतहोता. त्यामुळेच पाटील यांनी या प्रकरणाचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला.मात्र, बसचालकाने या पालकालाच मारहाण केली. या प्रकरणात पाटील यांनी केवळ बसचालकाकडे तक्रार केली होती. मात्र, शाळेकडे कोणतीच तक्रार केली नव्हती, हे समोर आले आहे.>रवी लव्हाटे हा नेहमीच माझ्या मुलासोबत अश्लील चाळे करत होता. त्याचा जाब विचारल्यावर त्याने मारहाण केली. त्यात माझी आणि माझ्या मुलाची कोणतीच चूक नसतानाही त्याने हा हल्ला केला. याची तक्रार बसमालकाकडे केली होती. आम्ही बसही बदलली होती. मात्र, रवीने मुलाला त्रास देणे सुरूच ठेवले होते. - मंगेश पाटील, पालक>मंगेश यांच्या मुलासोबत ९ महिन्यांपूर्वी घडलेल्या या प्रकाराची कल्पना बसमधील महिला प्रतिनिधीला दिलेली नव्हती. पालकांच्या बैठकीतही याची कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. तक्रार आली असती तर योग्य कारवाई करणे शक्य होते.- हितेंद्र नायक, विश्वस्त, गुरुकुल इंटरनॅशनल