शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन निर्घृण हत्या: आरोपीला अजन्म कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 23:34 IST

भार्इंदर येथील अवघ्या चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करणाºया मोहम्मद युनूस उर्फ झिरो उर्फ झिरु हाजी मोहम्मद शहा (२४) या आरोपीला अजन्म कारावास तसेच विविध कलमांखाली १३ हजारांच्या दंडाची शिक्षा ठाण्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश हेमंत पटवर्धन यांनी सोमवारी सुनावली आहे. तसेच त्याच्या अन्य दोन साथीदारांना चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ठळक मुद्दे खूनासाठी मदत करणाऱ्या अन्य दोघांना चार वर्षांची शिक्षा ठाणे न्यायालयाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भार्इंदर येथील अवघ्या चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करणाºया मोहम्मद युनूस उर्फ झिरो उर्फ झिरु हाजी मोहम्मद शहा (२४) या आरोपीला अजन्म कारावास तसेच विविध कलमांखाली १३ हजारांच्या दंडाची तसेच त्याच्या अन्य दोन साथीदारांना चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठाण्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश हेमंत पटवर्धन यांनी सोमवारी सुनावली आहे. वैद्यकीय तसेच परिस्थितीजन्य पुरावा न्यायालयाने ग्राहय मानून ही शिक्षा ठोठावली.भार्इंदर पूर्व येथील आझादनगर झोपडपट्टीजवळ असलेल्या ओमसाई इस्टेट आणि सोनम आशिष इमारतीच्या दरम्यान असलेल्या नाल्याजवळ आरोपींनी हे अघोरी कृत्य केले होते. ९ जानेवारी २०१७ रोजी रात्री ८ ते १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. यातील मोहम्मद युनूस याने त्याच भागात राहणारी ही अल्पवयीन मुलगी घरासमोर खेळत असतांना तिला चॉकलेटचे अमिष दाखवून तिचे अपहरण केले होते. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिच्या डोक्यात टणक वस्तूने प्रहार करुन तिची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर मोहम्मद शहा याच्यासह त्याचे साथीदार मोहम्मद रोजन उर्फ लंगडा राईनी (३१, रा. भार्इंदर) आणि जितेंद्र उर्फ जितू तिरथप्रसाद राव (३२) या तिघांनी मिळून तिला उचलून नाल्यातील गाळामध्ये तिचा मृतदेह बुजवून पुरावा नष्ट केला. याप्रकरणी ठाणे ग्रामीण नवघर पोलीस ठाण्यात खून, अपहरण, लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमाखाली १० जानेवारी २०१७ रोजी गुन्हा दाखल झाला होता. यातील तिन्ही आरोपींना १४ जानेवारी २०१७ रोजी नवघर पोलिसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे यांच्या पथकाने या प्रकरणाचा यशस्वीपणे तपास केला. यामध्ये १२ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीचे कपडे, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल, वैद्यकीय अहवाल आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीमध्ये भक्कम पुरावा सरकारी पक्षातर्फे पोलीस आणि सरकारी वकील उज्वला मोहळकर यांनी न्यायालयात सादर केला. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याचीही मागणी अ‍ॅड. मोहळकर यांनी लावून धरली. सर्व बाजू तपासल्यानंतर मुख्य आरोपी मोहम्मद युनूस याला अजन्म कारावास तसेच १३ हजारांचा दंड आणि मोहम्मद रोजन आणि जितेंद्र या त्याच्या दोन साथीदारांना चार वर्षांच्या सश्रम कारावासाची तसेच प्रत्येकी तीन हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने १४ डिसेंबर रोजी ठोठावली आहे.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालयMurderखून