शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचार करून हत्या करणाऱ्यास आजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 00:16 IST

दोघा मदतनिसांना चार वर्षांची शिक्षा; ठाणे न्यायालयाचे आदेश

ठाणे : भाईंदर येथील चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या मोहम्मद युनूस उर्फ झिरो उर्फ झिरु हाजी मोहम्मद शहा (२४) या आरोपीला अजन्म कारावास, तसेच विविध कलमांखाली १३ हजारांच्या दंडाची, तसेच त्याच्या अन्य दोन साथीदारांना चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठाण्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश हेमंत पटवर्धन यांनी सोमवारी सुनावली. जानेवारी, २०१७ मध्ये हा प्रकार घडला होता. यातील मोहम्मद युनूस याने त्याच भागातील अल्पवयीन मुलीचे चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण आणि नंतर निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर, मोहम्मद शहा याच्यासह त्याचे साथीदार मोहम्मद रोजन उर्फ लंगडा राईनी आणि जितेंद्र उर्फ जितू तिरथप्रसाद राव यांनी मिळून नाल्यातील गाळामध्ये तिचा मृतदेह बुजवून पुरावा नष्ट केला. या प्रकरणी ठाणे ग्रामीण नवघर पोलीस ठाण्यात खून, अपहरण, लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा तर आरोपींना १४ जानेवारी, २०१७ रोजी अटक केली.पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला. यामध्ये १२ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीचे कपडे, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल, वैद्यकीय अहवाल आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीमध्ये भक्कम पुरावा सरकारी पक्षातर्फे पोलीस आणि सरकारी वकील उज्ज्वला मोहळकर यांनी न्यायालयात सादर केला. आरोपींना जास्त शिक्षा देण्याचीही मागणी लावून धरली.