शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मीरा रोडमध्ये गटारातील दगड, डेब्रिजमुळे तुंबले सांडपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 23:35 IST

गटाराचे बांधकाम करताना त्यातील दगड, डेब्रिज आदी काढले जात नसल्याने सांडपाणी तुंबण्याचे प्रकार नेहमीचे झाले आहेत.

मीरा राेड  : मीरा-भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार नेहमीच जाचक ठरत आला आहे. गटाराचे बांधकाम करताना त्यातील दगड, डेब्रिज आदी काढले जात नसल्याने सांडपाणी तुंबण्याचे प्रकार नेहमीचे झाले आहेत. मीरा रोडमध्ये अशाच एका गटारातून भला मोठा दगड जेसीबीने काढावा लागला. त्यासाठी चेेंबर तोडावे लागले.मीरा- भाईंदरमध्ये गटार-नाले बांधण्याची कोट्यवधी रुपयांची कामे बांधकाम विभागाकडून काढली जातात. ही कामे काढण्यापासून ते कामाचा दर्जा आदींबद्दल तक्रारी होत असतात. गटार-नाल्यांचे काम करताना सांडपाणी ठेवण्यासाठी कंत्राटदाराकडून दगड, डेब्रिजच्या गोणी टाकून बांध केला जातो. दरम्यान, आतमध्ये काँक्रीट पडत असते. गटाराच्या स्लॅबसाठी वापरले जाणारे प्लायही काढले जात नाहीत. यामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार सतत होतात.असाच प्रकार मीरा रोडच्या हटकेश भागात उघडकीस आला आहे. १५ क्रमांकाच्या बसथांब्याकडे जाणारे काँक्रीट स्लॅबचे गटार पालिकेने नुकतेच बांधले आहे. या परिसरातील गौरव रिजन्सी, ग्रीष्मा एन्क्लेव्ह आदी भागांतील सांडपाणी तुंबत असल्याच्या रहिवाशांच्या सतत तक्रारी येत होत्या. नगरसेविका अनिता मुखर्जी यांच्याकडे तक्रारी आल्यावर त्यांनी स्वच्छता निरीक्षक अनिल राठोड यांच्यासह परिसराची पाहणी केली. महामार्गावर अनेक त्रुटीत्यावेळी गटारात मोठा दगड आढळला. सफाई कामगारांनी दगड काढण्याचा प्रयत्न केला, पण तो खूप मोठा आणि वजनदार असल्याने त्यांना शक्य झाले नाही. शेवटी बांधकाम विभागाला कळवण्यात आले. त्यानंतर जेसीबीने गटाराचे चेंबर तोडून आतील दगड बाहेर काढला तसेच डेब्रिजही काढले. आता तोडलेले चेंबर पुन्हा बांधले जात आहे. येथील हटकेश्वर शंकर मंदिरासमोर मोठा १२ फूट खोल नाला आहे. त्यातही बांधकामादरम्यानचे मोठे दगड तसेच असून सतत पाणी तुंबते, असे स्थानिकांनी सांगितले.