शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेत सातवा वेतन आयोग लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 02:41 IST

कामबंद आंदोलन मागे : महापौरांच्या मध्यस्थीला यश

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी कामगार संघटनेने मंगळवार पासून कामबंद आंदोलन सुरू केले. महापौर लीलाबाई अशान यांनी निर्णायक भूमिका वठविल्याने, जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्याला आयुक्तांनी मान्यता दिली. सातव्या वेतन आयोगाला मान्यता मिळताच कामगार संघटनेने कामबंद आंदोलन मागे घेतले.उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी कामगार संघटना पाठपुरावा करीत होती. संघटनेच्या मागणीला आयुक्त डॉ. राजा दयानिधी दाद देत नसल्याच्या निषेधार्थ कामगारांनी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू ठेवले. सोमवारी कामगार कृती समितीने आयुक्त डॉ. दयानिधी यांची भेट घेऊन, सातवा वेतन आयोग लागू करीत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारपासून कामबंद आंदोलनाची हाक दिली. मंगळवारी सकाळी १० वाजता शेकडो कामगारांनी कामबंद ठेवून महापालिका प्रवेशद्वारजवळ ते एकत्र आले. कामगार नेते चरणसिंग टाक, राधाकृष्ण साठे, दिलीप थोरात, दीपक दाबने आदींनी कामगारांना मार्गदर्शन केले.

महापौर अशान यांनी कामगार नेते, आयुक्त दयानिधी, उपायुक्त मदन सोंडे, मुख्य लेखा अधिकारी विकास चव्हाण यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलाविले. जानेवारीपासून कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली. जानेवारी महिन्याची ११ तारीख उलटूनही पगार झाला नसल्याबाबत कामगार नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. महापौर अशान यांच्या आदेशावरून आजच्या आज कामगारांचे वेतन देण्यात आल्याची माहिती उपायुक्त सोंडे यांनी दिली.

महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका कामगारांना बसला आहे. कामगारांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यास १२ दिवस उशीर झाल्याने, घरासह इतर कर्जाचे हप्ते भरले न गेल्याने कामगारांना भुर्दंड पडला आहे.- दिलीप थोरात, कामगार नेते, पालिका कामगार, कर्मचारी संघटना

 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर