शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

हल्ला करणाऱ्यांना सात वर्षे शिक्षा हवी; डॉक्टरांच्या संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:12 IST

ठाण्यातही खाजगी डॉक्टरांचे काम बंद

ठाणे : पश्चिम बंगाल येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ देशभरातील सर्व खाजगी डॉक्टरांनी सोमवारी पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक बंदमध्ये ठाण्यातील डॉक्टरही त्यात सामील झाले होते. त्यावेळी हल्लेखोरांना सात वर्षे शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी केली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्त्वाखाली येथील डॉक्टरांनी ठाणे शासकीय विश्राम गृहाजवळ निदर्शने केली. यावेळी सर्व खाजगी डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवा वगळता दिवसभर आपले क्लिनिक बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला.इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या नेतृत्त्वाखाली स्थानिक डॉक्टरनी सोमवारी दिवसभर काम बंद आंदोलन केले. यावेळी डॉक्टरांनी जोरदार निदर्शने केली. यात ठाणे शहरातील महिला व पुरुष डॉक्टर मोठ्या संख्येने सामील झाले होते. याबाबत बोलताना ठाणे शाखेचे अध्यक्ष दिनकर देसाई म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर तो हल्ला झाला त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन केले आहे.महाराष्ट्र सरकारने २०१० साली डॉक्टर संरक्षण कायदा मंजूर केला. परंतु, त्याची प्रभावी अमंलबजावणी योग्य रितीने होत नाही. मुळात आजतागायत या कायद्याअंतर्गत कोणालाही शिक्षाच झाली नाही. त्यातही यात केवळ तीन वर्षांची शिक्षेची तरतूद असल्याने त्याचा धाक राहिला नाही . परिणामी ही शिक्षा सात वर्षे इतकी करावी. राज्य सरकारने डॉक्टरांना पूर्णपणे संरक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळेच आज हे आंदोलन केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंप