शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘सेव्हन इलेव्हन’साठी झोन बदलला जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:26 IST

- राजू काळे  भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने राज्य सरकारच्या मान्यतेने आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन क्लब हाउसला सीआरझेड बाधित ...

- राजू काळे 

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने राज्य सरकारच्या मान्यतेने आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन क्लब हाउसला सीआरझेड बाधित एक मजल्याचे बांधकाम करण्यास परवानगी दिली. यानंतर त्याचे पंचतारांकित हॉटेलमध्ये परावर्तन दाखवून त्याला एक चटईक्षेत्र निर्देशांकासह अतिरिक्त एक चटईक्षेत्र निर्देशांक मिळविण्यासाठी परस्पर झोन फेरबदलाचे वारे प्रशासनाकडून वाहू लागले आहेत. तसा प्रस्तावच उद्याच्या महासभेत मान्यतेसाठी येऊ घातला आहे. प्रशासनाच्या या भाजपाधार्जिण्या कारभारावर विरोधी पक्षांसह नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.शहर विकास योजनेतील आराखड्यात राज्य सरकारच्या मान्यतेने झोन निश्चित होतात. तसेच सीआरझेडचा आराखडा थेट केंद्राच्या माध्यमातून तयार केला जातो. यातील शहर विकास योजनेच्या सध्याच्या आराखड्यात ही जागा सीआरझेड बाधित असून, ती ना विकास क्षेत्रात येते. नवीन आराखडा वादग्रस्त ठरल्याने त्यावर राज्य सरकारच्याच निर्देशानुसार बेकायदा बाबी वगळण्याचा कांगावा केला जाणार आहे. अशातच या क्लब हाउसच्या बाजूने नियोजित जेसल पार्क ते घोडबंदर रस्ता पूर्णपणे तयार झाला नसताना तो अंतर्गत रस्ता चक्क महामार्ग असल्याचे दाखवून त्याच्या अहवालावर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता मिळविण्यात आल्याचा मोठा घोटाळा मंत्रालयस्तरावर करण्यात आला आहे. क्लब हाउस ते महामार्गादरम्यानचे अंतर सुमारे तीन किलोमीटर इतके आहे. तर मेक इन इंडिया या संकल्पनेनुसार महामार्गापासून सुमारे ३० मीटर अंतरावर बांधकामाला (सीआरझेड असले तरी) परवानगी दिली जात असल्याची तरतूद नव्याने पर्यावरण धोरण्यात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.मेहता यांच्या क्लब हाउसला पालिकेने राज्य सरकारच्या मान्यतेने एक मजल्याची परवानगी दिली असली तरी चक्क चौथ्या मजल्यापर्यंतचे बेकायदा बांधकाम सुरू आहे. त्यावर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने आपल्या डोळ्यावर झापड लावली आहे का, असा प्रश्न सामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. पालिकेने हाच न्याय सामान्यांच्या बांधकामालाही लावावा, अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी केलीआहे.शहरातील अनेक धोकादायक इमारतींचा पुनर्विकास सीआरझेडमुळे लटकला आहे. त्या इमारतींजवळून गेलेल्या अंतर्गत रस्त्यांनाही महामार्ग जाहीर करून त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी माजी नगरसेवक प्रमोद सामंत यांनी केली आहे.