शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

विकास प्रकल्पांच्या दिरंगाईवर सी-टाइप निविदेचा तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:35 IST

केडीएमसीचे एकमत; स्थायी समितीत झाली चर्चा

कल्याण : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी सरकारी विभागांमध्ये सी-टाइप निविदा मागवल्या जातात. मात्र, कल्याण-डोंबिवली या एकमेव महापालिकेत या प्रकारच्या निविदा मागवल्या जात नाहीत. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होत नसल्याने त्यांचा खर्च वाढतो. तसेच प्रकल्पाची डिझाइनही चुकीची होते. या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी या पुढील विकासकामांच्या निविदा सी-टाइप पद्धतीने काढण्यावर प्रशासनाचे एकमत झाले आहे.शहाड-टिटवाळा रस्त्यावरील उल्हास नदीवरील जुन्या पुलाला समांतर असा नवा पूल बांधण्याचा विषय शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत चर्चेला आला होता. या कामासाठी सी-टाइप निविदा मागवण्याचा विषय पुढे आला. महापालिकेने यापूर्वी कल्याण-विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान ‘एफ’ केबिन येथे रेल्वे उड्डाणपूल तयार केला आहे. तसेच उल्हासनगर-कल्याणला जोडणारा वालधुनी रेल्वे उड्डाणपूल पूल आणि ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपूल बांधले आहेत. या पुलांचे डिझाइन ‘एस’ आकाराचे आहेत. या प्रकल्पांसाठी डिझाइन समंत्रकांकडून करून घेतले होते. तर त्याचे विकासकाम अन्य कंत्राटदार कंपनीकडून केले होते. कंत्राटदार व डिझाइन तयार करणाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने कामाला सुरुवात होण्यास विलंब होतो. तसेच काम चुकीच्या पद्धतीने केले जाते.परिणामी प्रकल्पाचा खर्च वाढत असल्याचा त्याचा भुर्दंड महापालिकेस सोसावा लागतो. त्यावर तोडगा काढण्यासाठी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी सी-टाइप पद्धतीची निविदा काढावी, अशी सूचना प्रशासनाला केली आहे. शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनीही त्यांची सूचना मान्य केली आहे. सी-टाइप निविदा पद्धतीत कंत्राटदारानेच प्रकल्पाची डिझाइन करणे अपेक्षित आहे. ‘व्हीजेटीआय’सारख्या नामांकित संस्थेकडून त्याची मान्यता घेऊन मगच कामाला सुरुवात केली गेली पाहिजे, असे सी-टाइप निविदेत अपेक्षित आहे.दरम्यान, महापालिकेने आंबिवली-शहाड रेल्वे स्थानकादरम्यान वडवली रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचे कंत्राट दिले आहे. मात्र, १० वर्षे होऊनही त्याचे काम सुरूच आहे. या कामाची सी-टाइप निविदा न निघाल्याने पुलाचे काम रखडले आहे, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.समंत्रक - कंत्राटदारांत समन्वयाचा अभावकेडीएमसीत स्वतंत्र प्रकल्प डिझाइन तयार करणारा विभाग नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या डिझाइनसाठी समंत्रक नेमावे लागतात. मात्र काही वेळेस ते काम अर्धवट सोडून देतात. त्यामुळे समंत्रक व कंत्राटदार यांच्यात समन्वय राहत नाही.सी-टाइप निविदा पद्धतीत कंत्राटदारच डिझाइन बनवत असल्याने वेळ कमी लागतो. तसेच काम लवकर सुरू होऊन ते लवकर मार्गी लागण्यास मदत होते. त्यामुळे कंत्राटदार कंपनीला कामावर लक्ष केंद्रित करता येते. सी-टाइप निविदेच्या या जमेच्या बाजू असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका