शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
3
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
4
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
5
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
6
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
7
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
8
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
9
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
10
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
11
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
12
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
13
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
14
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
15
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
16
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
17
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
18
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
19
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
20
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व

केडीएमसीचा सिक्वेल आता ठाण्यात

By admin | Updated: October 21, 2016 04:27 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देण्यापूर्वीच येथील शिवसेनेने स्वबळावर लढण्याची पूर्वतयारी सुरू केलेली

- अजित मांडके,  ठाणेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देण्यापूर्वीच येथील शिवसेनेने स्वबळावर लढण्याची पूर्वतयारी सुरू केलेली आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेची ताकद भाजपाच्या शक्तीपेक्षा कितीतरी अधिक असल्याने आपले संख्याबळ टिकवून ठेवणे व काही प्रमाणात वाढवणे, हेच शिवसेनेचे लक्ष्य आहे, तर तोळामासा प्रकृतीच्या भाजपाचा सत्ता स्थापनेपेक्षा आपले संख्याबळ जेवढे वाढवता येईल, तेवढे वाढवणे हाच हेतू आहे. त्यामुळे शेजारील कल्याण-डोंबिवली महापालिकेतील संघर्षाचा आणि निकालाचा सिक्वेल ठाण्यात मतदारांना पाहायला मिळणार आहे.ठाणे हे वर्षानुवर्षे शिवसेनेचेच असल्याने भाजपाने आतापर्यंत या शहरातील संघटनेकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, मोदीलाटेच्या जोरावर लोकसभा आणि विधानसभेत भाजपाने ठाण्यात जोरदार मुसंडी मारल्याने आता शिवसेनेच्या मैदानात पाय रोवण्याची हीच संधी असल्याचे भाजपाला वाटते. विधानसभेतील यशाचा फायदा पालिका निवडणुकीत होईल, असा कयास होता. परंतु, आरक्षण सोडत जाहीर झाली आणि सोडतीचा फायदा शिवसेनेलाच अधिक होईल, असा भीतीचा गोळा भाजपाच्या पोटात आला. त्यामुळे युतीसाठी काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला. परंतु शिवसेनेनेच स्वबळावर लढण्याची भाषा केल्याने भाजपाची पंचाईत झाली आहे. २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेकडे २४ जागा मागितल्या होत्या. परंतु, अखेरच्या क्षणी त्यांना २२ जागांवर समाधान मानावे लागले. त्यापैकी ८ नगरसेवक विजयी झाले. शिवसेनेने आधीपासून स्वबळाची मोर्चेबांधणी केली आहे. चार वॉर्डांचा मिळून एक पॅनल असल्याने त्याचा फायदा शिवसेनेलाच अधिक होईल, असे सध्याचे तरी चित्र आहे. स्वबळाचा निर्णय लादला गेलाच तर विधानसभेच्या चमत्काराची पुनरावृत्ती करण्याकरिता सर्व शक्ती पणाला लावण्याची तयारी भाजपाने केली आहे. जुने ठाणे, घोडबंदरचा काही पट्टा, कोपरी, वागळेतील काही भाग, टेंभीनाका, जांभळीनाका, नौपाडा आदींसह इतर भागांत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपाला आखणी करावी लागणार आहे. त्यामुळे ठाकरे यांचा स्वबळाचा नारा ठाण्यात भाजपाची दमछाक करण्याची शक्यता अधिक आहे.शिवसेनेचा गड खेचण्याचा होता विचारठाणे शहर मतदारसंघाते भाजपाला ७० हजार ८८४ मते तर, शिवसेनेला ५१ हजार १० मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत त्यात ७२८६ मतांची वाढ जरी झाली असली तरी वाढलेल्या मतदारांपुढे ही वाढ फारच कमी आहेत. कोपरी-पाचपाखाडीत शिवसेनेला १ लाख ३१६ मते मिळाली, तर भाजपाने येथे ५० हजारांची आघाडी घेतली होती. ओवळा-माजिवडामध्ये शिवसेनेला ६५ हजार ५७१ मते तर भाजपाला ५७ हजार ६६५ मते मिळाली होती. कळवा-मुंब्रामध्ये शिवसेनेला ३८ हजार ८५० मते पडली होती. तर, भाजपाला १२ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. त्यामुळेच २९ वर्षे शिवसेनेकडे असलेला ठाण्याचा गड आपल्याकडे खेचण्याचा विचार भाजपाचा होता.