शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
5
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
6
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
7
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
8
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
9
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
10
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
11
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
12
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
13
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
14
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
15
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
16
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
18
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
19
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
20
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग

सेनेच्या निर्मला माखिजा पुन्हा स्वगृही  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 05:42 IST

मीरा-भार्इंदरमधील शिवसेनेच्या पहिल्या महिला आघाडीप्रमुख निर्मला माखिजा यांनी दोन वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता.

भार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील शिवसेनेच्या पहिल्या महिला आघाडीप्रमुख निर्मला माखिजा यांनी दोन वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. परंतु, भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने दिलेले आश्वासन पाळले नसल्यामुळे त्या पुन्हा स्वगृही परतल्या.माखिजा या शहरातील एका नामांकित शाळेच्या संस्थापिका आहेत. एकेकाळी सेनेचे तत्कालीन नेते गणेश नाईक यांच्या त्या कट्टर समर्थक मानल्या जायच्या. माखिजा यांनी नाईक यांच्यासोबत राष्टÑवादीत प्रवेश केला होता. स्थानिक पातळीवर त्यांना महत्त्वाचे पद असतानाच राष्टÑवादीतून त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आपल्या शाळेला मालमत्ताकरात सवलत मिळावी, यासाठी पालिकेकडे त्या पाठपुरावा करत होत्या.पालिकेने राजकीय वजन असलेल्या काही शाळांना २५ टक्के गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याच्या अटीवर मालमत्ताकरात सुमारे ५० टक्के सवलत दिली. हा फायदा आपल्याही शाळेला मिळावा, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता. त्याला प्रशासनाने दाद न दिल्याने ते काम करून देण्यासह यंदाच्या पालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या आश्वासनावर त्या भाजपात दाखल झाल्या होत्या. त्यांनी भाजपातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असतानाच भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने त्यांचा अपेक्षाभंग केला. त्यामुळे नाराज होऊन त्यांनी अखेर स्वगृही परतणे पसंत केले.खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत त्यांनी सेनेत प्रवेश केला. त्याचप्रमाणे दीपा भारद्वाज यांनीही शिवसेनेत प्रवेश घेतला.आदित्य ठाकरेंचा आज रोड शोपालिका निवडणुकीत शिवसेनेला विजय मिळवून देण्यासाठी उद्या सकाळी १० वाजता युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार आहे. रोड शो ला घोडबंदर मार्गावर असलेल्या चेना गाव येथून सुरूवात होणार आहे. पुढे तो काशिमिरा वाहतूक बेट मार्गे मीरा रोड, भार्इंदर पूर्व व पश्चिम येथून पुन्हा काशिमिरा वाहतूक बेटमार्गे दहिसर चेकनाका येथे समारोप होईल.यासाठी सेनेचे सुमारे १० हजाराहून अधिक कार्यकर्ते या रॅलीत दुचाकीद्वारे सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.तसेच सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी व उमेदवार या रोड शोमध्ये हजेरी लावणार आहेत. दुपारी २ वाजता रोड शो संपेल अशी माहिती सूत्रांनी दिली.