शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या इनकमिंगने बसणार धक्का

By admin | Updated: April 24, 2017 23:42 IST

भिवंडी महापालिकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार आहे. कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दोन दिवसात अर्जांचे वाटप सुरू होणार आहे.

रोहिदास पाटील / अनगावभिवंडी महापालिकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार आहे. कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दोन दिवसात अर्जांचे वाटप सुरू होणार आहे. त्याचवेळी शिवसेनेत दणदणीत इनकमिंग होणार असल्याने ते अन्य पक्षांसाठी धक्कातंत्र असेल, असा दावा आमदार रूपेश म्हात्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. प्रभागानुसार उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. सर्वच पक्षातील आजी- माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. भिवंडीचा विकास ज्या पध्दतीने होणे आवश्यक होते तो लोकप्रतिनिधी व प्रशासनास करता आला नाही. परिणामी शहर बकाल झाले. नागरी सुविधा सुटलेल्या नाहीत, रस्त्यांची दुरवस्था आहे. रस्ता रूंदीकरणातील बाधितांच्या पुर्नवसनाच्या योजनाच नसल्याने रस्ते रूंद होऊ शकले नाही याकडेही म्हात्रे यांनी लक्ष वेधले. भिवंडीतही क्लस्टर योजना लागू करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. कचऱ्याची समस्या गंभीर आहे. कचरा टाकण्यासाठी दापोडा चाविद्रा येथील डम्पिंगला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे. नागरी सुविधा सोडवण्यासाठी शिवसेना आग्रही राहणार असून शहराचा सर्वांगिण विकास हाच निवडणुकीचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असेल असे म्हात्रे म्हणाले. अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस, समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर सेनेचा महापौर झाला. शिवसेनेने आपल्यापरीने विकासकामे केली असा दावा केला.