शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या सिंधी मतांवर सेनेचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 04:03 IST

डोंबिवलीनंतर थेट उल्हासनगरला खासदारांचे जनसंपर्क कार्यालय उघडून त्याच्या उद््घाटनासाठी थेट पक्षप्रमुखांची जाहीर सभा घेणाऱ्या शिवसेनेच्या हालचाली या भाजपाची सिंधी व्होट बँक उद््ध्वस्त करण्यासाठीच असल्याचे उघड झाले आहे.

- सदानंद नाईकउल्हासनगर : डोंबिवलीनंतर थेट उल्हासनगरला खासदारांचे जनसंपर्क कार्यालय उघडून त्याच्या उद््घाटनासाठी थेट पक्षप्रमुखांची जाहीर सभा घेणाऱ्या शिवसेनेच्या हालचाली या भाजपाची सिंधी व्होट बँक उद््ध्वस्त करण्यासाठीच असल्याचे उघड झाले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतांची बेगमी आणि कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ या तीन विधानसभा मतदारसंघांची तयारीच शिवसेनेने यानिमित्ताने सुरू केल्याचे मानले जाते.उल्हासनगरात तब्बल साडे चारलाख मतदार आहेत. यातील अर्धेअधिक मतदार सिंधी भाषक असून लोकसभा आणि तीन विधानसभांसाठी ते निर्णायक ठरणारे आहेत. शहरातील कॅम्प नं- १, २ आणि ३ तसेच म्हारळ, कांबा, वरप या गावांचा समावेश उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात होतो. कॅम्प नंबर ४ व ५ परिसरातील एक लाख ४० हजार मतदार अंबरनाथ विधानसभा; तर कॅम्प नंबर ४ परिसरातील ४० हजार मतदार कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात मोडतात. त्यामुळेच कल्याण लोकसभा आणि तीन विधानसभेतील सिंधी मतदार डोळ््यासमोर ठेवून शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.सध्या भाजपात आयलानी विरूद्ध कलानी असा संघर्ष तापला आहे. त्यातही निर्णायक ठरणारा साई पक्ष संभ्रमावस्थेत असला, तरी शांत आहे. उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ७० टक्के मतदार सिंधी भाषिक आहेत. शिवसेनेने सिंधी समाजाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविल्यास सिंधी, मराठी आणि इतर मतदार एकत्र यतील, अशी शिवसेनेची गणिते आहेत.उल्हासनगर विधानसभेसाठी शिवसेनेने सिंधी भाषक उमेदवार दिल्यास त्याचा फायदा अंबरनाथ आणि कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघांना होईल, असे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी गृहित धरल्याची चर्चा आहे.पक्षाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी अंबरनाथ-कल्याण रस्ता रूंदीकरणातील बांधकामांबाबत तात्कालीन आयुक्तांना जाब विचारला होता. यातूनच अवैध बांधकामांना पाठीशी घालण्याचा आरोप ठेवत तत्कालीन महापालिका आयुक्तांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द का करून नये? अशी नोटीस बजावली होती. भाजपापेक्षा शिवसेना सिंधी व्यापाºयांच्या मदतीला धावून आली, असा त्याचा परिणाम झाला आणि सिंधी व्यापाºयांशी शिवसेनेचे नाते जोडले गेले. त्यातही ठाकरे यांच्या सभेत सिंधी संतांचा सत्कार करून शिवसेनेने धार्मिकदृष्ट्या सहानुभूती मिळवण्याचाही प्रयत्न केला.।भांडणामुळे नाराजीकलानी-आयलानी या दोन कुटुंबातील लढतीत सिंधी समाज दोन गटात विभागला गेला. दोघांच्या भांडणात शहराचा विकास ठप्प झाला असून सिंधी समाजातही स्थलांतराचे प्रमाण वाढले, अशा प्रकारची माहिती समोर येऊ लागली. त्याचा फायदा शिवसेनेने उचलला. आयलानी आणि कलानी नको, असे म्हणणाºयांची संख्या वाढली आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना