शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

ज्येष्ठ साहित्यिक कृ. ज. दिवेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 01:42 IST

कॉलेज जीवनापासून त्यांचा लेखन प्रवास अविरत सुरू होता. साहित्य क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारदेखील त्यांना मिळालेला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ लेखक कृष्णाजी ज. दिवेकर (कृ. ज. दिवेकर) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्यावर जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा मंदार, पत्नी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

कॉलेज जीवनापासून त्यांचा लेखन प्रवास अविरत सुरू होता. साहित्य क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारदेखील त्यांना मिळालेला होता. तसेच ठाण्यामध्ये ८४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात त्यांचा गौरव करण्यात आला होता. ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या ठाणे गुणिजन पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. ब्राह्मण शिक्षण मंडळाचे ते सभासद होते. उत्कृष्ट लेखकाबरोबरच ते उत्तम वाचकही होते. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आणि कथा संग्रह अशा एकूण ४०पेक्षा अधिक पुस्तकांचे प्रकाशन झालेले आहे.

पोकळी निर्माण झाली कृ. ज. दिवेकर अर्थात काका म्हणजे साहित्याचा सातत्याने वाहणारा झरा. काकांचे आणि माझे आमच्या वाचनाच्या छंदामुळे विशेष जमायचे. त्यांची लिखाण शैली आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मिश्कील असा होता. काका आणि मी पत्र स्वरूपात गप्पा मारायचो, ते आता शक्य होणार नाही. माझे बाबा म्हणजेच नंदू जोशी यांच्या निधनानंतर दिवेकर काकांनी वडिलांप्रमाणे माझी काळजी घेतली. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.- केदार जोशी, सचिव, ब्राह्मण शिक्षण मंडळ