शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेनेची कार्बन कॉपी, भाजपाचा जाहीरनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 03:22 IST

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी रहिवाशांकडून आलेल्या तब्बल ८७ हजार सूचनांच्या आधारे सत्ताधारी भाजपाने तयार केलेल्या जाहीरनाम्यातील बहुतांश आश्वासने ही शिवसेनेच्या वचननाम्यातील कार्बन कॉपी केल्यासारखी असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भाजपानेही मराठी व हिंदी भाषांत जाहीरनामा प्रसिद्ध केला असला, तरी त्याच्या मराठी प्रती उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत.शिवसेनेच्या ...

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी रहिवाशांकडून आलेल्या तब्बल ८७ हजार सूचनांच्या आधारे सत्ताधारी भाजपाने तयार केलेल्या जाहीरनाम्यातील बहुतांश आश्वासने ही शिवसेनेच्या वचननाम्यातील कार्बन कॉपी केल्यासारखी असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भाजपानेही मराठी व हिंदी भाषांत जाहीरनामा प्रसिद्ध केला असला, तरी त्याच्या मराठी प्रती उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत.शिवसेनेच्या वचननाम्यातील नाट्यगृह, जलवाहतूक, घोडबंदर किल्ला सुशोभीकरण, जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना आदी काही मुद्दे भाजपाने जसेच्या तसे उचलले असल्याची चर्चा आहे.‘मेरा सुझाव’ मोहिमेंंतर्गत ८७ हजार १९५ सूचना नागरिकांकडून मिळाल्याचा दावा भाजपाने केला असून त्यामध्ये रस्त्यांची दुरवस्था, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, अस्वच्छता, पार्किंग व वाहतूककोंडी आदी समस्या सोडवण्यास प्राधान्य देण्याचा आग्रह धरला आहे. नागरिकांची ही भावना म्हणजे सत्ताधारी भाजपाच्या अपयशावर ठेवलेले बोट असल्याचे बोलले जात आहे. भाजपाच्या ‘संकल्पपत्र’ या हिंदीतील जाहीरनाम्याचे जीसीसी शाळेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन झाले. महापौर गीता जैन, आमदार योगेश सागर व नरेंद्र मेहता, जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आदी या वेळी उपस्थित होते.जाहीरनाम्यातील आश्वासनेमीरा-भार्इंदर पालिकेची नवी इमारत, मेट्रो, सूर्या पाणीयोजना, भार्इंदर-नायगाव वसई खाडीवरील पूल, दहिसर-भार्इंदर समांतर रस्ता, जेसल पार्क-घोडबंदर रस्ता, सुभाषचंद्र बोस स्टेडियम, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, जलवाहतूक, ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचे सुशोभीकरण, नाट्यगृह, पोलीस आयुक्तालय, सिमेंटचे रस्ते, फळ व भाजी मार्केट, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, चौकांचे सुशोभीकरण, शहराचे आकर्षक प्रवेशद्वार, भार्इंदर रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण, जेसल पार्क व भार्इंदर चौपाटीचे सुशोभीकरण, आर्ट गॅलरी व क्रीडा प्रशिक्षण, महिला भवन, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, आयटी पार्क आणि इंडस्ट्रियल झोन, नवीन महाविद्यालये, उत्तन येथे दोन जेट्टी, महाराणा प्रताप, एपीजे अब्दुल कलाम, सरदार वल्लभभाई पटेल यांचे पूर्णाकृती पुतळे.