शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या वैशाली खराडे भाजपात, निवडणुकीत तिकीट कापल्याने झाल्या होत्या नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 03:47 IST

महापालिका निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार आयात करून निष्ठावंतांना डावलले. अशाच प्रकारे तिकीट कापल्याने ३५ वर्षांपासून सेनेच्या निष्ठावंत मानल्या जाणाºया महिला उपजिल्हा संघटक वैशाली खराडे

भार्इंदर : महापालिका निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार आयात करून निष्ठावंतांना डावलले. अशाच प्रकारे तिकीट कापल्याने ३५ वर्षांपासून सेनेच्या निष्ठावंत मानल्या जाणाºया महिला उपजिल्हा संघटक वैशाली खराडे यांनी आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपात प्रवेश केला. यामुळे सेनेला चांगलाच धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.पक्षाच्या कार्याला सतत धावून जाणाºया खराडे यांनी यंदाची महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. तसे आदेशही त्यांना वरिष्ठांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उमेदवारी मिळणार असल्याचे गृहीत धरून त्यांनी प्रचाराला जोमाने सुरुवात केली.परंतु, निवडणुकीतील उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीच भाजपाच्या नगरसेविका प्रतिभा तांगडे-पाटील यांनी सेनेत प्रवेश केल्याने ऐनवेळी खराडे यांचे तिकीट कापण्यात आले. खराडे यांनी यापूर्वी पालिका निवडणूक तीन वेळा लढवली आहे.राष्टÑवादीतून सेनेत प्रवेश घेतलेल्या माजी महापौर कॅटलिन परेरा यांच्यासोबत प्रचार सुरू केला होता. परंतु, उमेदवारी हिसकावून घेतल्याने खराडे यांनी प्रचार गुंडाळून ठेवला. याचा धसका कॅटलिन यांनी घेत त्यांचे ब्लडप्रेशर कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.कॅटलिन यांच्याखेरीज प्रभाग ८ मधील उर्वरित तीन जागांवरील सेनेच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. याचे खापर खराडे यांच्या डोक्यावर फुटू लागल्याने त्यांनी वरिष्ठांच्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करत थेट सेनेलाच सोडचिठ्ठी दिली. यामुळे पक्षातील घुसमट हळूहळू बाहेर येऊ लागली असल्याचे बालले जात आहे.३५ वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेनेचे निष्ठेने कार्य करत होते. परंतु, यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचे निश्चित झाले असतानाही ऐनवेळी बाहेरील व्यक्तीसाठी माझे तिकीट कापण्यात आले. गेल्या निवडणुकीतही जाणीवपूर्वक माझ्यासमोर बलाढ्य उमेदवार उभे केले गेले. किती अपमान सहन करायचा.- वैशाली खराडे.भाजपाला एकहाती सत्ता मिळाल्याने सेनेत राम उरला नसल्याची निष्ठावंतांची भावना आहे. निष्ठावंतांना डावलून ऐनवेळी आयारामांना उमेदवारी दिल्याने सेनेत नाराजांची संख्या वाढली आहे. येत्या काही दिवसांत शिवसेनेतील आणखी निष्ठावंत भाजपात पक्षप्रवेश करतील.- हेमंत म्हात्रे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष