शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

सेनेचे नगरसेवक, माजी महापौर देवळेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 00:53 IST

कल्याण-डोंबिवलीत हळहळ : अभ्यासू कार्यकर्ता हरपल्याची खंत, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी महापौर व शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर (५३) यांचे बुधवारी उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, रवींद्र फाटक, माजी आमदार नरेंद्र पवार व अन्य पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचा एक चांगला अभ्यासू कार्यकर्ता हरपल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली.कोरोना संकटाचे भय न बाळगता देवळेकर यांनी गरजूंना अन्नधान्याचे वाटप केले. परप्रांतीय मजुरांना गावी पाठवण्यासाठी फॉर्म भरून घेतले. पक्षाच्या विविध बैठकांना ते हजर राहत होते. आॅगस्टमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याने खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. कोरोनावर त्यांनी मात केली होती. मात्र, त्यांना दिलेली औषधे व इंजेक्शनचा दुष्परिमाण होऊन त्यांची प्रकृती खालावली. त्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.देवळेकर यांचा जन्म कोकणात झाला होता. कल्याणमध्ये त्यांनी शालेय शिक्षण, तर बिर्ला महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन जीवनात ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारावून गेले. त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेचे काम सुरू केले. १९८७ मध्ये राम मंदिर उभारणीकरिता सुरू केलेल्या रामशिला आंदोलनात ते सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन गंगापूजन केले, तेव्हा त्यातही ते सहभागी झाले होते.अभ्यासू कार्यकर्ते असल्याने त्यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी दिली गेली. या काळात त्यांनी चांगले काम केल्याने त्यांना नगरसेवकपदाची उमेदवारी दिली गेली. २००७ ते २००८ या कालावधीत ते स्थायी समिती सभापती झाले. त्यांच्या सभापतीपदाच्या कालावधीत मनपात काँग्रेस आघाडीची सत्ता होती. सभागृहात एखादा वादाचा प्रसंग घडला, तर चर्चेतून ते मार्ग काढत असत.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिम मतदारसंघातून पक्षाने देवळेकर यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यावेळी भाजपने बंडखोरी करत अपक्ष उमेदवार उभा केल्याने मतांचे विभाजन झाले. त्यामुळे मनसेचे प्रकाश भोईर निवडून आले. २०१० मध्ये पुन्हा ते नगरसेवकपदी निवडून आले. मात्र, जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरविल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा स्वीकृत सदस्य म्हणून घेण्यात आले. दरम्यान, त्यांनी २०१५ मध्ये नगरसेवकपदाची निवडणूक पुन्हा लढविली. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांचे सहकारी विजय साळवी यांना उमेदवारी दिली. पक्षाने देवळेकर यांना महापौरपदाची उमेदवारी दिली. १० मे २०१८ ला त्यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला. देवळेकर यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीत स्मार्ट सिटी शिखर परिषद भरवली गेली. त्यानंतर, केडीएमसीची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाली.सर्वच पक्षांमध्ये जिव्हाळ्याचे संबंधच्डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी असल्याने येथे आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये माजी महापौर राजेंद्र देवळेकर हे आवर्जून हजेरी लावत असत.च्डोंबिवलीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या संमेलनाला ५० लाखांचा निधी देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीच्या स्फोटानंतर ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या परिसंवादामध्ये ते सहभागी झाले होते. अभ्यासू वृत्तीमुळे त्यांचे अन्य राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी मैत्रीचे संबंध होते.‘थ्री आर’मधून एक ‘आर’ गळाला : राजेंद्र देवळेकर महापौर असताना शिवसेना नगरसेवक रमेश जाधव व राजेश मोरे यांच्यासह त्यांचे समीकरण जुळले होते. त्यामुळे पालिकेत या त्रिकुटाला ‘थ्री आर’ असे नाव पडले होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना