शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनगीत आठवडाभरात होणार ध्वनिमुद्रित

By admin | Updated: January 10, 2017 06:25 IST

शहरात होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी गीत तयार करण्यात येत आहे. सध्या त्याची जोमात तयारी सुरू असून आठवडाभरात

जान्हवी मोर्ये / डोंबिवलीशहरात होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी गीत तयार करण्यात येत आहे. सध्या त्याची जोमात तयारी सुरू असून आठवडाभरात ते ध्वनिमुद्रित केले जाईल, अशी माहिती गीताचे संगीतकार केतन पटवर्धन यांनी दिली.कवी श्रीनिवास आठल्ये यांनी संमेलनगीत लिहिले आहे. गीताचे बोल ‘संपन्नले नव्वदावे मराठी पाहा येथे साहित्य संमेलन’ असे आहे. मराठी साहित्य संमेलनाचे गीत हे मंदारमाला वृत्तात लिहिण्यात आले आहे. डोंबिवलीच्या साहित्य, संस्कृतीचा उल्लेख त्यात आहे. ज्येष्ठ साहित्यिक पु.भा. भावे, शं.ना. नवरे, सुरेंद्र वाजपेयी तसेच डोंबिवलीचे भूषण गणेश मंदिर, गावदेवी मंदिराचा या गीतात उल्लेख आहे. हे गीत समूहगीत असून त्याचे गायन अनेक गायक मिळून करणार आहेत. या गीताचे संगीत संयोजन निखिल निजसुरे करीत आहेत. या गीतावर कथ्थक नृत्याविष्कार केला जाणार आहे. गीत हे नृत्यातून प्रतित केले जाईल. डोंबिवलीतील प्रथितयश कथ्थक गुरू हे नृत्य सादर करतील. येत्या आठवडाभरात त्याचे ध्वनिमुद्रण केले जाईल, असे पटवर्धन यांनी स्पष्ट केले. संगीतकार सुखदा भावे याही संमेलनगीत तयार करीत आहे. त्यांचे गीत हे संमेलनाचे प्रमोशन करणारे असणार आहे. त्याचे ध्वनिमुद्रण थेट केले जाणार आहे. या गीताचे शब्द अनंत पेंढारकर यांनी लिहिले आहेत. डोंबिवलीतील गायक व वादकांचा या गीतात सहभाग आहे. १३ ते १४ गायक व गायिका हे गीत गाणार आहेत. तसेच कोरससाठी नवोदित गायकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. हे प्रमोशन गीत येत्या आठवडाभरात तयार करून संमेलनाचे आयोजक आगरी युथ फोरमकडे सपूर्द केले जाणार आहे. त्यानंतर, हे गीत यू ट्यूब व आॅनलाइन व अपलोड केल्यावर ते सगळ्यांना एका क्लिकवर पाहता येणार आहे. या गीताच्या निर्मितीत साहित्यावर अधिक भर दिला गेला आहे, असे भावे यांनी स्पष्ट केले. संमेलनाची कच्ची तालीम आज... : संमेलनात गीत, गायन, काव्यवाचन, कथाकथन, स्वगत, अभिवाचन आणि नृत्य या विविध कलाकारांना कला सादर करता येणार आहे. या सगळ्या कलाकारांचा एक कार्यक्रम संमेलनाच्या पूर्वसंध्येला बसवला जाणार आहे. त्यांना साहित्य ही संकल्पना देण्यात आली आहे. साहित्य संकल्पनेवर हा कार्यक्रम आधारित असून त्याची कच्ची तालीम मंगळवार, १० जानेवारीला प्रगती महाविद्यालयाच्या हॉलमध्ये होईल. त्यात ४० ते ५० कलाकार असतील. तालीम कच्ची असली तरी त्यापैकी एकही कार्यक्रम रद्द केला जाणार नाही. सगळे कार्यक्रम घेतले जातील. सगळ्यांना संधी दिली जाईल. गीत, भावगीत, भक्तिगीत, अभंग, नृत्य, ज्ञानेश्वर, मुक्ताई यांच्यासह पौरणिक नृत्यावर अधिक भर दिला जाईल, अशी माहिती दीपाली काळे यांनी दिली.