शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वरसावे पूलवर सेल्फीची हौस, बेकायदा पार्किंग आणि विरुद्ध दिशेने येणारी वाहने बनली धोकादायक

By धीरज परब | Updated: August 23, 2023 16:36 IST

वसई खाडी वरील वरसावे नवीन पूल हा आधीच कामास विलंब झाल्याने रखडला.

मीरारोड - मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील नवीन वरसावे खाडी पूल खड्डे व निकृष्ठ कामामुळे आधीच वादग्रस्त बनला असताना आता सदर पुलावर वाहने उभी करून सेल्फी घेण्याची नको ती हौस भागवली जात आहे. शिवाय पुलावर बेकायदा पार्किंग आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होऊन अपघाताची भीती वाढली आहे.  

वसई खाडी वरील वरसावे नवीन पूल हा आधीच कामास विलंब झाल्याने रखडला. या वर्षी २८ मार्च रोजी पूल वाहतुकीसाठी खुला केला असताना पहिल्याच पावसाळ्यात पुलावर खड्डे पडून आतील सळ्या दिसू लागल्या. या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठेकेदार व संबंधीत विरुद्ध काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

त्यातच खाडीवरील हा पूल असल्याने लोकं सेल्फी घेण्यासाठी तसेच विरंगुळा म्हणून ह्या पुलावर वाहने उभी करतात. पुलावरून कोणी थेट खाडीत पडल्यास वा आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील पुलावर वाहने थांबवल्याने होऊ शकतो.  रिक्षापासून अवजड कंटेनर, मालवाही आदी वाहने ह्या पुलावर सर्रास  बेकायदा उभी केली जातात. गंभीर बाब म्हणजे पुलावर वसई कडून उलट दिशेने रिक्षा, दुचाकी पासून मोठी वाहने सर्रास बेजबाबदार वाहन चालक चालवत आहेत. 

वास्तविक या पुलावरून मुंबई व ठाण्या कडून येणारे वाहने भरधाव वसई - गुजरातच्या दिशेने जात असतात. त्यामुळे पुलावर सेल्फी घेणे, विरंगुळासाठी तसेच पार्किंग म्हणून वाहने उभी करणे, विरुद्ध दिशेने वाहने चालवणे आदी अपघाताला कारणीभूत ठरणारे आहे. यातून गंभीर व जीवघेणे अपघात होऊ शकतात. परंतु हे गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच पुलावर वाहने उभी करणारे, विरुद्ध दिशेने वाहने चालवणारे यांच्यावर ठोस कारवाई साठी मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.