शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा विभागाची भूकंपमापन यंत्रणा गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:35 IST

भंगारात फेकल्याची शक्यता : भातसा धरणासह परिसरातील गावखेड्यांचीही सुरक्षा धोक्यात

रवींद्र सोनावळे।लोकमत न्यूज नेटवर्कशेणवा : शहापूर तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रात भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाकडून बसविण्यात आलेली बंद अवस्थेतील भूकंपमापन यंत्रणा पडझड झालेल्या इमारतीतून गायब झाली आहे. ही यंत्रणा भंगारात फेकून देण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धरण क्षेत्रात भूकंपमापन यंत्रणाच अस्तित्वात नसल्याने भातसा धरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भातसा धरण क्षेत्रात व परिसरातील खर्डी ,वाशाळा ,लाहे येथे १९८४-८५ मध्ये बसविण्यात आलेल्या ३ भूकंपमापन यंत्रणा ३० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्याने ही उपकरणे आता कालबाह्य झाल्याने नादुरूस्त अवस्थेत होती. यातील एक भूकंपमापन केंद्र भातसा धरण प्रकल्प वसाहतीजवळ होते. मात्र ते दुरूस्तीअभावी बंद पडले. भातसानगर, वाशाळा, लाहे येथील नादुरु स्त व बिघाड झालेली भूकंपमापन यंत्रे बंद पडली आहेत. ही यंत्रे बंद पडण्यापूर्वी वेळीच बदलणे गरजेचे आहे व येथे आता डिजिटल व अद्ययावत भूकंपमापन यंत्र बसविणे गरजेचे आहे, असा लेखी पत्रव्यवहार भातसा धरणाचे उपअभियंता यू .एस .हावरे यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता व अभियांत्रिकी संशोधन संस्थेस कळविले होते. मात्र जलसंपदा विभागाच्या लालफितीच्या कारभारामुळे व सरकारी अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे भूकंपमापन यंत्रणा अखेर बंद पडली आहे. भातसा धरण परिसरात ज्या ठिकाणी हे यंत्र बसविले होते त्या इमारतीची आता पडझड झाली आहे.यंत्र बसविण्यात आलेल्या खोलीचे लोखंडी दरवाजे ,खिडक्या चोरीला गेले असून बाहेरील छत कोसळले आहे. दरवाजे नसल्याने या खोलीत उंदीर, घुशी, कुत्रे ,मोकाट जनावरे यांनी मुक्काम ठोकला आहे. येथील बंद पडलेले भूकंप मापन यंत्रही गायब झाले असून अक्षम्य दुर्लक्षपणामुळे अतिसंवेदनशील असलेल्या भातसा धरणाजवळ होणाºया हालचालींवर लक्ष ठेवणारी यंत्रणाच येथे सध्या अस्तित्वात नाही.भातसा धरण क्षेत्राजवळ असलेल्या खर्डी व परिसरात १९८२ च्या काळात भूकंपाचे धक्के जाणवले होते. यावेळेस भूकंपाच्या भीतीने घाबरलेल्या खर्डी, लाहे, भातसानगर परिसरातील गावपाड्यातील नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने अन्यत्र स्थलांतर केले. यामुळे हे क्षेत्र भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. खर्डीपासून हाकेच्या अंतरावर भातसा जलाशय आहे. त्यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील भूकंपमापन यंत्रणाच मृत अवस्थेत असल्याने धरणासह गावखेड्यांची सुरक्षा धोक्यात आहे.भातसा धरण क्षेत्रात तातडीने भूकंपमापन यंत्र बसविण्यासाठी महाराष्ट्र इंजिनिअर रिसर्च इन्स्टिट्यूटकडे आम्ही पत्रव्यवहार केला असून भातसा धरण व परिसरात एकूण ७ भूकंपमापन यंत्र बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.- योगेश पाटील,कार्यकारी अभियंता,भातसा जलसंपदा विभाग