शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

यशला पाहताच आईच्या अश्रूंचा बांध फुटला...

By admin | Updated: February 15, 2017 04:31 IST

शहरातील इंदिरानगरमधून बेपत्ता झालेला अडीच वर्षांचा यश वर्मा सुखरूप असल्याचे प्रत्यक्ष पाहताच त्याच्या आईला अश्रू अनावर झाले.

टिटवाळा : शहरातील इंदिरानगरमधून बेपत्ता झालेला अडीच वर्षांचा यश वर्मा सुखरूप असल्याचे प्रत्यक्ष पाहताच त्याच्या आईला अश्रू अनावर झाले. यश लातूरला सापडला असून तो तेथील ‘कलापंढरी चाइल्डलाइन’ या संस्थेच्या ताब्यात असल्याचे त्याच्या पालकांना समजले होते. मात्र, त्याची भेट होईपर्यंत त्याच्या पालकांना काही सुचत नव्हते. पण, नशीब बलवत्तर म्हणून यश सुखरूप मिळाल्याची भावना त्याच्या पालकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. टिटवाळा पोलीस उपनिरीक्षक गणपत पोळ, त्यांचे पथक आणि यशचे आईवडील शनिवारी पहाटे २ च्या सुमारास लातूरहून टिटवाळ्यात पोहोचले. त्यानंतर, सकाळी अधिकृतपणे कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर यशला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. त्या वेळी त्याच्या पालकांनी ‘लोकमत’कडे वरील भावना व्यक्त केली. टिटवाळ्यातील इंदिरानगरमधून सोमवार, ६ फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास यश बेपत्ता झाला होता. यश कुठेही दिसत नसल्याने त्यांनी सगळीकडे त्याचा शोध घेतला. पण, तो कुठेच न सापडल्याने त्यांनी टिटवाळा पोलिसांत धाव घेतली. सुरुवातीला पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून घेतली. पण, त्याच्या पालकांनी शिवसैनिक किशोर शुक्ला यांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला. त्याचदरम्यान तेथील एका चायनीजवाल्याने यशला एक अनोळखी व्यक्ती रेल्वे स्थानकाकडे घेऊन गेल्याचे सांगितले. त्याच आधारावर पोलिसांनी त्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदवला. मात्र, याचदरम्यान यशच्या वडिलांना यश हवा असेल तर २० लाख रुपये द्या, असा खंडणीचा फोन आला होता. त्यामुळे पोलीस सतर्क झाले होते.सोशल मीडिया, रेल्वे तसेच सर्वच पोलीस ठाण्यांत यशचे फोटो, तपशील पाठवण्यात आले. यशचा फोटो पाहून लातूर पोलिसांनी ७ फेब्रुवारीला फोटो व्हायरल केलेल्या नंबरवर संपर्क साधला. त्यांनी यश आमच्याकडे असल्याचे कळवले. यश त्याचे स्वत:चे तसेच वडिलांचे नाव उमेश असल्याचे सांगत होता. ही जुजबी माहिती पडताळल्यानंतर लातूर पोलिसांनी त्याचा फोटो ई-मेल केला. हा फोटो पाहून टिटवाळा पोलीस व त्याचे पालक लातूरला रवाना झाले. त्याला तेथील पोलिसांनी ‘कलापंढरी चाइल्डलाइन’च्या ताब्यात ठेवले होते. तेथे त्याला पाहिल्यानंतर त्याच्या आईवडिलांना अश्रू आवरता आले नाहीत. सर्व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लातूर पोलिसांनी त्याला आईवडील व टिटवाळा पोलिसांच्या स्वाधीन केले. ते त्याला घेऊन शनिवारी शहरात आले. (वार्ताहर)