शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत असेपर्यंत पाच मिनिटं तरी भेटू द्या!, नातेवाइकांची विनवणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 00:02 IST

अंबरनाथ कोविड सेंटरमधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोना रुग्णाला भेटण्यासाठी नातेवाइकांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन केल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. अंबरनाथ पालिकेच्या डेंटल कॉलेजमधील कोविड केअर सेंटरबाहेर मंगळवारी हा प्रकार घडला.

अंबरनाथच्या शिवगंगा नगरमध्ये राहणारे गौतम तेलंग हे मागील १४ दिवसांपासून अंबरनाथ पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. ते दाखल झाले तेव्हा त्यांची ऑक्सिजन पातळी ९४ होती. त्यामुळे नातेवाइकांनी सहा रेमडेसिविर इंजेक्शन आणून दिले. मात्र, त्यानंतरही त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले. या १४ दिवसांत तेलंग यांचे एकदाच नातेवाइकांशी व्हिडिओ कॉलवरून बोलणे झाले. यावेळी आपल्याला जेवण दिले जात नसून, आपल्याकडे लक्षही दिले जात नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यामुळे धास्तावलेल्या तेलंग कुटुंबीयांनी एकदा तरी तेलंग यांना भेटू द्यावे, अशी मागणी हॉस्पिटल प्रशासनाकडे केली. मात्र, कोविड नियमांमुळे ती मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे मनसेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांच्यासह तेलंग यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी हे कोविड केअर सेंटरबाहेर आले आणि किमान पाच मिनिटे पीपीई कीट घालून तरी आम्हाला त्यांना भेटू द्या, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीसाठी त्यांनी गेटवरच ठिय्या मांडला.

घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीसही तिथे दाखल झाले, मात्र कुटुंबीयांची मागणी कायम होती. गेल्या १४ दिवसांपासून रुग्ण इथे दाखल असताना त्यांची खुशाली कळवली जात नाही, त्यांना जेवण दिले जात नाही. त्यांचे अंगही पुसले जात नाही, असा आरोप परिवाराने केला. रुग्ण उपचार घेत असताना कुटुंबीयांचा मानसिक आधार रुग्णासाठी गरजेचा असतो. त्यामुळे किमान पाच मिनिटे तरी त्यांना भेटू द्या, अशी मागणी यावेळी मनसेने केली. तर जोपर्यंत ते जिवंत आहेत, तोपर्यंत आम्हाला भेटू द्या, अन्यथा  मृतदेह हातात देणार का? असा सवाल केला.

पीपीई किट घालून मुलाने घेतली भेटnअशी आर्त विनवणी तेलंग कुटुंबीयांनी केली. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासन आणि पोलीसही निःशब्द झाले. अखेर तेलंग यांचा मुलगा हर्षदीप याला पीपीई कीट घालून पाच मिनिटांसाठी वडिलांना भेटू दिले. कोरोनाचा रुग्ण दाखल झाल्यावर त्याला कुणालाच भेटता येत नाही. यामुळे नातेवाइकांची घालमेल होते. nआपली व्यक्ती बरी असेल ना, त्याची काळजी घेतली जात असेल ना, औषधे वेळेत दिली जात असतील ना असे प्रश्न नातलगांना सतावत असतात. पण ते काळजी करण्याव्यतिरीक्त काहीच कळू शकत नाही. त्यामुळे बाधितांची चांगली काळजी घेतली जावी, एकाला तरी भेटण्याची मुभा द्यावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या