शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी

By admin | Updated: July 3, 2017 06:19 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेची निवडणूक काँग्रेस, समाजवादी पक्ष, भारिपसारख्या समविचारी व धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी करून लढवण्याची

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेची निवडणूक काँग्रेस, समाजवादी पक्ष, भारिपसारख्या समविचारी व धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी करून लढवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली आहे. त्यासाठी प्रदेशस्तरावर चर्चा सुरू आहे. जिल्हाध्यक्षही येत्या आठवडाभरात निश्चित होण्याची शक्यता असून माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह निरीक्षकांनी रविवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. खासदार, आमदार निवडून येण्यासह मीरा- भार्इंदर महापालिकेत १५ वर्षांत तीन वेळा महापौरपद भूषवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची अवस्था दयनीय आहे. माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सांसह अनेक नगरसेवक, जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडून भाजपा, शिवसेना व काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. स्थानिक नेतृत्वच न राहिल्याने अखेर माजी पालकमंत्री गणेश नाईक व माजी खासदार संजीव नाईक यांनी आता पक्षाची धुरा हाती घेतली आहे. पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीमधून ६० जणांनी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक म्हणून अर्ज भरले आहेत. नाईक यांच्या भार्इंदर येथील कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या वेळी निरीक्षक दिनकर तावडे, सोनल पेडणेकर आदी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी व्हावी, यासाठी तशी आधीपासूनच बोलणी सुरू झाली होती. पण, जिल्हाध्यक्ष जयंत पाटील, सुरेश दळवी आदींचे अंतर्गत मतभेद होऊन ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत एकाही पॅनलमध्ये लढत देणारा प्रबळ असा उमेदवार दिसत नाही. परिणामी, काँग्रेस आघाडी करेल याबद्दल साशंकता आहे. त्यातही शिवसेना, भाजपा स्वतंत्र लढत असल्याने जातीयवादी पक्षांविरुद्ध काँग्रेसशी आघाडी करण्यास राष्ट्रवादी तयार आहे. शिवाय, भारिप व समाजवादी पक्षासोबत आघाडीची बोलणी नाईक यांच्याकडून सुरू आहेत, तर काँग्रेससोबत आघाडीची बोलणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आघाडी होणार का याकडे लक्ष लागलेले आहे.उमेदवारांची यादी काँग्रेसला देणारपक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी देणार आहोत. काँग्रेसने आघाडी नाही केली; तर अन्य मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी लागेल, असे संजीव नाईक यांनी सांगितले. आम्ही आमची प्रभागानुसार यादी करून काँग्रेसला देणार आहोत. त्यावर, जागावाटप व आघाडीची चर्चा होईल, असे नाईक यांनी स्पष्ट केले.