शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये आढळले कुपोषित बालक, महिनाभरातील दुसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:38 IST

शहरातील आझादनगर येथे १० महिन्यांचे कुपोषित बालक आढळले. मागील महिन्यात असेच अतिकुपोषित बालक आढळल्याने खळबळ उडाली होती.

उल्हासनगर : शहरातील आझादनगर येथे १० महिन्यांचे कुपोषित बालक आढळले. मागील महिन्यात असेच अतिकुपोषित बालक आढळल्याने खळबळ उडाली होती. मुलावर मध्यवर्ती रु ग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात अतिकुपोषित बालक उपचारासाठी दाखल झाले, अशी माहितीरु ग्णालयाचे प्रमुख चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांना मिळाली. त्यांनी स्वत: मुलाची तपासणी करून योग्य उपचारासाठी ठाणे येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. कॅम्प नं.-३ येथील हनुमान मंदिराशेजारी आझादनगर येथे राहणारे नसिरुद्दीन सिद्दीकी यांच्या शाहजाद नावाच्या मुलाचे वजन जन्मापासून कमी आहे. काही महिन्यांपासून त्याची तब्येत खालावली. अखेर, आईवडिलांनी उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. या वेळी तपासणीत बालकाचे वजन ३ किलो असल्याचे समोर आले. जन्मानंतर बालकाचे वजन तिप्पट होणे अपेक्षित आहे. मात्र, शाहजादचे वजन वाढलेच नाही. त्यामुळे कुपोषित गटातच मोडत असल्याची माहिती डॉ. नांदापूरकर यांनी दिली. सध्या हे बालक आजारी असून त्याला कोणत्या व्याधींनी ग्रासले आहे, याची पाहणी बालरोगतज्ज्ञांकडून केली जात आहे. शहरात महिनाभराच्या आत दुसरे कुपोषित बालक आढळल्याने अंगणवाडी सेविकांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :thaneठाणे