शहरं
Join us  
Trending Stories
1
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
2
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
3
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
4
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
5
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
6
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
7
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
8
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
9
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
10
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
11
"मला तुरुंगात ठेवलं तर आप प्रचार न करता ७० पैकी ७० जागा जिंकेल’’, अरविंद केजरीवाल यांचा भाजपाला टोला 
12
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
13
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
14
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
15
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

समुद्र, खाडीने व्यापलेल्या दांडी गावात बिबट्याचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 10:48 PM

गेल्या वर्षाचा सर्व्हे होता सूचक; काही दिवसांपासून कोंबड्यांना केले लक्ष्य

पालघर : तालुक्यातील किनारपट्टीवरील दांडी या गावातील एका बंद घरात लपून बसलेल्या नर जातीच्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले असले तरी अन्य बिबट्यांचा परिसरात अधिवास आहे का? याचा शोध घेण्यासाठी वनविभागाची टीम २-३ दिवस दांडी व परिसरात शोध घेणार आहेत.सोमवारी संध्याकाळी ७.०० च्या सुमारास दांडी गावातील विजय तामोरे यांच्या बंद असलेल्या घरात बिबट्या शिरल्याची माहिती बोईसर वनविभागाला कळल्या नंतर उपवन संरक्षक मोरे यांनी आपल्या टीम सह दांडी गाव गाठीत आपल्या जवळील दोन पिंजाऱ्याच्या साहाय्याने मोठ्या शिताफीने या नर बिबट्या ला पिंजºयात पकडण्यात यश मिळविले. हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमलेले असताना जराशी चूक एखाद्याच्या जीवावर बेतू शकत होती. बघ्यांची गर्दी दूर होत नसताना स्थानिक तरुण, सागरी पोलीस यांच्या सहकार्याने वनविभागाने आपले काम उत्तमरीत्या निभावले.मागील काही दिवसांपासून गावातील लोकांच्या कोंबड्या, बदके, कुत्रे व मांजर यांच्या मृत्यूच्या घटना घडत असताना सोमवारी रात्री कुत्र्यांचे भुंकणे स्थानिकांचे लक्ष वेधीत होते. परंतु बिबट्याच्या आगमनाची पूर्व कल्पना ते मुके कुत्रे देत असल्याची पुसटशी कल्पनाही ग्रामस्थांना आली नव्हती. परंतु काही ग्रामस्थांनी त्याला तामोरे यांच्या स्नानगृहात दडून बसल्याचे पाहिल्यानंतर न घाबरता दरवाजा बंद करून त्याला पकडण्यात वनविभागाचे काम सोपे केले.तारापूर अणुशक्ती प्रकल्प टप्पा ३ व ४ साठी मौजे पोफरण व अक्करपट्यी गावाच्या पुनर्वसनात सुमारे ४०० एकर जागा या दोन गावाकडून घेण्यात आली. त्याठिकाणी कुठलेही काम करण्यात आले नसल्याने त्या ठिकाणी झाडे-झुडपे वाढली आहेत.या भागात गेल्या वर्षी वनविभागाच्या सर्व्हेमध्ये बिबट्या असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले होते. त्यामुळे अजूनही बिबटे असावेत अशी शंका वजा भीती ग्रामस्थ व्यक्त करीत असल्याने उपवनसंरक्षक मोरे यांनी आपल्या टीम तैनात केल्या आहेत.पकडलेल्या बिबट्याची तपासणी करुन सुटकामागच्या वर्षी दिसलेल्या बिबट्याचे सीसीटीव्ही फुटेज मोरे यांनी मागवले असून पकडण्यात आलेल्या बिबट्यांशी आणि फुटेज मधील बिबट्यांशी साधर्म्य तपासले जाणार असल्याची माहिती मोरे यांनी लोकमतला दिली. सोमवारी पकडण्यात आलेल्या बिबट्याची तपासणी करून त्याला पुन्हा जंगलात सोडून दिल्याची माहिती मोरे यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :leopardबिबट्याpalgharपालघर