शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सेंट इन्फंट शाळेवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:01 IST

बेकायदा इमारत : मुख्याधिकाऱ्यांनी दिले गुन्हे दाखल करण्याचे आदेश

अंबरनाथ : अंबरनाथ पूर्व भागात एका आदिवासी महिलेच्या मालकी हक्काच्या जागेवर सेंट इन्फंट शाळा उभारून त्या शाळेवर बेकायदा मजले तयार करून शाळा चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकारी देविदास पवार यांनी दिले आहेत. शाळेच्या जागेचा वाद असला तरी शाळेची इमारत ही बेकायदा मजले वाढवून तयार केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सोबत या शाळेची परवानगी रद्द करण्यासंदर्भात शिक्षण विभागाच्या संचालकांकडे पत्र पाठविण्याचे आदेशही दिले आहेत.

अंबरनाथच्या नवरेनगर भागात म्हाडा वसाहतीच्या शेजारी असलेल्या जागेवर ही शाळा आहे. या शाळेच्या जागेचा वाद असून या जागेवर एका आदिवासी वृध्द महिलेने दावा केला आहे. बुधीबाई वाघे असे या महिलेचे नाव असून सर्वे नंबर ९२ मधील ५४ गुंठे जागेपैकी २७ गुंठे जागा ही वाघे यांच्या हिशाची आहे. मात्र वाघे यांना यांच्या हक्काची जागा न देताच थेट ५४ गुंठे जागाच शाळेला देण्यात आली. या प्रकरणी वाघे यांनी प्रशासन आणि महसूल विभागात आपला लढा सुरू ठेवला आहे. वाघे यांच्या जागेवरील शाळेवर कारवाई करून जागा मोकळी करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात आली. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. गेली दोन वर्ष या प्रकरणी वाघे या एकट्याच या प्रकरणी लढा देत आहेत. अखेर या प्रकरणी मुख्याधिकारी पवार यांनी पालिकेत संबंधित विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली. तसेच या प्रकरणी केलेल्या पाठपुराव्याचे अवलोकन केल्यावर पालिकेच्या अतिक्रमण विभागाला आणि नगररचना विभागाला या प्रकरणी शाळेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करून संबंधित अहवालही शिक्षण विभागाच्या संचालकांकडे पाठविण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात पालिकेचे पत्र तयार करून या शाळेसंदर्भातील माहिती आणि त्याच्या संदर्भातील अतिक्रमणांची माहिती शिक्षण विभागाकडे पाठविण्याचे आदेश शिक्षण मंडळाच्या अधिकाºयांना दिले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही या अनुषंगाने तत्काळ कारवाई करण्याची मागणी पालिकेने केली आहे.

पालिकेची भूमिका महत्त्वाचीदरम्यान, या शाळेची तक्रार या आधीही वरिष्ठ स्तरावर करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळेच्या पहिल्या, दुसºया आणि तिसºया मजल्याचे अतिक्रमण पालिकेने त्यांच्या पद्धतीने काढून टाकण्यासंदर्भातील आदेश दिले आहेत. अतिक्रमणाच्या मुद्द्यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेही या आधीच हात वर केले आहे. डिसेंबर २०१८ मध्ये या संदर्भातील आदेश काढण्यात आले आहे. त्यामुळे या संदर्भात आता पालिकेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 

माझ्या हक्काच्या जागेसाठी मी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, प्रशासन दाद देत नाही. उपोषणही केले, तरी अजून न्याय मिळालेला नाही. पालिकेच्या अधिकाºयांना ही शेवटची संधी देणार आहे. त्यानंतरचे आंदोलन हे तीव्र स्वरूपाचे असेल. त्यानंतर कोणतीही तडजोड करणार नाही.- बुधाबाई वाघे,जागेच्या मालकया संदर्भात सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर अतिक्रमण केल्याप्रकरणी शाळेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. तसेच शाळेची परवानगी रद्द करण्याबाबतही पाठपुरावा करण्याचे आदेश शिक्षण मंडळाला देण्यात आले आहेत.- देविदास पवार,मुख्याधिकारी.