शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी पालिकेत निलंबित कर्मचाऱ्यांकरिता पायघड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:18 IST

स्थायी समिती सदस्य, प्रशासनाचे प्रस्ताव, नागरिकांचा मात्र विरोध

भिवंडी : महापालिका सेवेतून विविध कारणाने निलंबित झालेल्या अधिकारी व कर्मचाºयांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सदस्यांनी तसेच प्रशासनाने ठेवला आहे. दोषी कर्मचाºयांवर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्यांना पुन्हा कामावर रूजू करून घेण्याच्या प्रस्तावाला नागरिकांतून विरोध होऊ लागला आहे.महासभेत अथवा स्थायी समितीमध्ये अयोग्य ठराव केल्यास प्रशासन तो अमलात न आणता विखंडीत करण्यासाठी शासनाकडे पाठवू शकते, अशी माहिती मनपा आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली. महापालिकेत पदोन्नती घोटाळ््याप्रकरणी पालिकेने रमेश बंडू थोरात, भागवत लक्ष्मण थिटे व अशोक बाबूराव लाडकर यांना २१ महिन्यांपूर्वी निलंबित केले होते. प्रशासनाने संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस न देता अधिकाºयांची चौकशी सुरु करुन त्यांना निलंबित केले. तब्बल २१ महिन्यांच्या प्रदीर्घ निलंबनानंतर पुन्हा कामावर हजर करून घेण्यासाठी लेखी पत्र सदस्य विलास पाटील यांनी स्थायी समितीला दिले होते. या विषयावर अलीकडेच झालेल्या स्थायी समितीमध्ये चर्चा झाली. मात्र या बैठकीला पाटील हजर नसल्याने हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला. पुढील बैठकीमध्ये हा विषय मंजूर करण्यात येणार असल्याचे संकेत नगरसेवकांनी दिले. या बाबत मनपा आयुक्त मनोहर हिरे म्हणाले की, महापालिका कायद्याच्या विरोधात मंजूर केलेला ठराव शासनाकडे पाठवून विखंडीत करण्यात येईल.त्याचबरोबर तीन वर्षापूर्वी १२ सफाई कामगारांना बडतर्फ करण्यात आले होते. या सर्व कर्मचाºयांना पुन्हा कामावर घेण्याचा प्रस्ताव मनपा उपायुक्त दीपक कुरळेकर यांनी स्थायी समितीस सादर केला आहे. पालिकेतील निलंबित कर्मचाºयांबाबत ठोस निर्णय प्रशासनाने वेळीच घेणे अपेक्षित असून जे दोषी आहेत त्यांनी बडतर्फ केले पाहिजे. तसेच ज्यांच्यावर फौजदारी कारवाई अपेक्षित आहे, त्यांच्याबाबत प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाºयांकडून दिरंगाई सुरू आहे. ही प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहिल्यास आर्थिक नुकसान आहे.पालिकेतील निलंबित कर्मचाºयांबाबत ठोस निर्णय प्रशासनाने वेळीच घेणे अपेक्षित असून जे दोषी आहेत त्यांनी बडतर्फ केले पाहिजे. तसेच ज्यांच्यावर फौजदारी कारवाई अपेक्षित आहे, त्यांच्याबाबत प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाºयांकडून दिरंगाई सुरू आहे. अशी प्रकरणे निकाली काढण्यासाठी पालिकेने अधिकारी नियुक्त केले असतानाही अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे वेळकाढूपणाचा आरोप प्रशासनावर केला जात आहे. पालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीMuncipal Corporationनगर पालिका