शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

श्रेयाच्या वादावर अखेर पडदा

By admin | Updated: April 21, 2017 00:04 IST

मीरा-भार्इंदर महापलिकेने शहरात बांधलेल्या एकमेव क्रीडा संकुलाच्या दुसऱ्या लोकार्पणावरून शिवसेना-भाजपात श्रेयाचा वाद निर्माण झाला होता

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापलिकेने शहरात बांधलेल्या एकमेव क्रीडा संकुलाच्या दुसऱ्या लोकार्पणावरून शिवसेना-भाजपात श्रेयाचा वाद निर्माण झाला होता. त्यावर शिवसेनेने हा महापौरांचाच अधिकार असल्याचे स्पष्ट करत श्रेयाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. मात्र भूमिपूजन व उद्घाटनाच्या माध्यमातून श्रेय लाटण्यासाठी नेहमी पहिल्या रांगेत असलेले आमदार नरेंद्र मेहता यांना पालिकेने आवर न घातल्यास शिवसेना गप्प बसणार नाही असा इशाराही दिला आहे. दरम्यान, दुसरा लोकार्पण सोहळा महापौरांच्या अधिकारात उरकण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू झाला आहे. त्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करुन कामाला युद्धपातळीवर सुरूवात करण्यात आली. त्या अनुषंगाने प्रशासनाने २३ एप्रिलला लोकार्पण सोहळा उरकण्याचा निर्णय घेतला. परंतु, कामे पूर्ण न झाल्याने लोकार्पणाच्या मुहूर्तावर अनिश्चिततेचे सावट आहे. तीन वर्षापासून बंद असलेले क्रीडा संकुल स्थानिक खेळाडूंसाठी खुले करण्यासाठी प्रशासनाने अखेर धोरण निश्चित केले आहे. तत्पूर्वी त्यातील अपूर्णावस्थेतील कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. ती पूर्ण झाल्यानंतरच खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संकुलाचे दुसऱ्यांदा लोकार्पण होणार आहे. यापूर्वी पालिकेने २०१४ मध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते संकुलाचे लोकार्पण केले होते. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घाईघाईने लोकार्पण उरकण्यात आले होते. बहुतांश कामे अपूर्ण असल्यामुळे तीन वर्षापासून बंद आहे. दरम्यान ते चालवायचे कसे, असा यक्ष प्रश्नही पालिकेसमोर उभा ठाकला. तसेच त्याच्या धोरण निश्चितेतही बराच कालावधी गेला. संकुल त्वरित खुले करावे यासाठी राजकीय व सामाजिक स्तरावर पाठपुरावा सुरू झाला. प्रसंगी उपोषणही करण्यात आले. अखेर प्रशासनाने नमते घेत त्यातील काही बैठे खेळ सुरु केले. परंतु, अद्याप ते पूर्णपणे खुले केलेले नाही. दरम्यान, हे संकुल आपल्या प्रभागात येत असल्याने प्राधान्याने त्याच्या लोकार्पणाचा अधिकार सेनेचाच असल्याचा दावा नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर यांनी केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २१ एप्रिलला संकुलाचे लोकार्पण करण्याचा निर्णय झाला. त्याचवेळी भाजपानेही २३ एप्रिलला लोकार्पणाचा मुहूर्त निश्चित केल्याने संकुलाच्या श्रेयावरील वादाला तोंड फुटले. अखेर शिवसेनेने संकुलाच्या लोकार्पणाचा अधिकार महापौरांचा असल्याचे मान्य करून हे संकुल राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांच्या खासदार निधीतून बांधण्यात आल्याने त्यांना नियोजित लोकार्पणाचे आमंत्रण द्यावे, अशी सेनेची मागणी असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)