शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील शाळा, कॉलेज होणार तंबाखूमुक्त

By admin | Updated: July 9, 2015 23:59 IST

सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आता राज्य शासनाने पावले उचलली आहेत.

अजित मांडके ठाणेसिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आता राज्य शासनाने पावले उचलली आहेत. त्यानुसार, राज्यातील सर्वच शाळा-महाविद्यालये तंबाखूमुक्त करण्याचे शासनाने निश्चित केले असून त्यानुसार शाळेच्या १०० यार्ड क्षेत्रात सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने विकण्यास बंदी घातली असून ती मोडणाऱ्यास २०० रुपयांचा दंड आणि शिक्षा केली जाणार आहे. याही पुढे जाऊन शाळेच्या जिन्यांसह प्रत्येक मजल्यावरील लिफ्टच्या प्रवेशद्वारावर धूम्रपानबंदीबाबतचे सूचना फलक लावण्याच्या नवीन मागदर्शक तत्त्वांची आचारसंहिता संस्थाप्रमुखांना घालून दिली आहे. विशेष म्हणजे शाळा-महाविद्यालयांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनीसुद्धा अशा पदार्थांचे सेवन करू नये, असेही यात स्पष्ट केले आहे.भारतात रोज २५०० लोक तंबाखूशी संबंधित आजारांमुळे मृत्यू पडतात. गॅट्सच्या (ग्लोबल यूथ तंबाखू सर्व्हे) सर्व्हेनुसार महाराष्ट्रात २.५ कोटी लोक तंबाखूचा वापर करतात. तंबाखू आणि त्याच्या दुष्परिणामांना जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक समस्या म्हणून घोषित केले आहे. १३ ते १५ वर्षे वयोगटांतील १४ टक्क्यांपेक्षा जास्त मुले याचे सेवन करतात. त्यामुळेच शासनाने याविरोधात चोख पावले उचलत नवीन परिपत्रक जाहीर केले आहे.