शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या भूखंडावरील गाळे मंगळवारी तोडणार

By admin | Updated: January 11, 2017 07:17 IST

कल्याण-बदलापूर महामार्गावरील महात्मा गांधी विद्यालयाच्या भूखंडावर अनधिकृतपणे उभारलेले ४५ व्यापारी गाळे येत्या मंगळवारी

अंबरनाथ : कल्याण-बदलापूर महामार्गावरील महात्मा गांधी विद्यालयाच्या भूखंडावर अनधिकृतपणे उभारलेले ४५ व्यापारी गाळे येत्या मंगळवारी, १७ जानेवारीला तोडले जाणार आहेत. तसे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळावा आणि पालिकेने या कारवाईसाठी पथक नेमण्याचे आदेशही तहसीलदारांनी दिले आहे. त्यामुळे गाळेधारक धास्तावले आहेत. कल्याण-बदलापूर महामार्गाच्या कामासाठी अंबरनाथमधील दीड हजार अनधिकृत व्यापारी गाळे तोडण्यात आले होते. ही कारवाई होणार असल्याचे लक्षात येताच अंबरनाथ तहसीलदार कार्यालयासमोरील अनधिकृत गाळेधारकांनी तत्काळ या दुकानांच्या मागेच महात्मा गांधी विद्यालयाच्या जागेवर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. ही जागा जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला शेती विषय शिकविण्यासाठी दिली. या जागेवर अतिक्रमण करुन व्यापारी गाळे उभारण्यास शाळेनेदेखील या व्यापाऱ्यांना अप्रत्यक्ष मदत केली. महात्मा गांधी विद्यालयाने या अनधिकृत बांधकामांकडे उघडपणे दुर्लक्ष केल्याने व्यापाऱ्यांनी तब्बल ४५ गाळे या परिसरात उभारले होते. तीन वर्षापूर्वी त्यावर थातूरमातुर कारवाई करण्यात आली होती. मात्र व्यापाऱ्यांनी पुन्हा तेथे गाळे उभारुन बस्तान बसवले होते. या अनधिकृत व्यापारी गाळ्यांवर कारवाई करुन शासकीय जागा पुन्हा ताब्यात घेण्याची मागणी शौकत शेख या कार्यकर्त्याने केली होती. मात्र स्थानिक प्राधिकरण त्याकडे दुर्लक्ष करीत राहिल्याने शेख यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणी महसूल विभागाने सुनावणी घेऊन निर्णय देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले होते. त्यानुसार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुनावणी घेत ही बांधकामे हटविण्याचे आदेश दिले. त्यानुसार अंबरनाथचे तहसीलदार प्रशांत जोशी यांनी या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्याचे आणि अंबरनाथ पालिकेने अतिक्रमण हटविण्यासाठी पथक देण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही कारवाई १७ जानेवारीला होईल, असे ठरविण्यात आले आहे. पालिकेने आणि पोलीसांनीही त्याला तयारी दर्शवली आहे. तीन वर्षे या अनधिकृत गाळ्यांचा प्रश्न निकाली निघत नसल्याने या प्रकरणात थेट राज्य शासनाला आदेश देण्याचे वेळ आली. (प्रतिनिधी)