शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मेंढवणच्या विद्यार्थ्यांना मिळाली हक्काची शाळा

By admin | Updated: April 20, 2017 03:53 IST

गावात एकाच वेळी जि.प. शाळा व शासकिय आश्रमशाळा असल्याचा फटका बसून शाळा बंद झाली. मात्र, आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने

शौकत शेख , डहाणूगावात एकाच वेळी जि.प. शाळा व शासकिय आश्रमशाळा असल्याचा फटका बसून शाळा बंद झाली. मात्र, आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने पालकांच्या मनात पाल्यांच्या सुरक्षे विषयी पाल चुकचुकली. पुढे शाळा उभारणीवरुन गावकऱ्यांचे मानअपमान नाट्य चालल्याने हा प्रश्न रेंगाळून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. शिक्षणाची अशी वाताहत अखेर शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांनी थांबविली असून १४ एप्रिल रोजीचे ज्ञानदिनाचे औचित्य साधून अधिकारी व शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांचे उद्बोधन करू न वातावरण निमिर्ती केली. सोमवारी मेढवण येथील जि.प. शाळेचे दार विद्यार्थ्यांसाठी उघडले असून गावातही उत्साहाचे वातावरण होते.पालघर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या मेंढवण या गावी प्राथमिक शिक्षणाची गेल्या पाच वर्षांपासून परवड सुरु होती. या गावात अगदी पूर्वी पासून जिल्हा परिषदेची शाळा होती. त्याच गावात आदिवासी प्रकल्पांतर्गत चालविली जाणारी शासकीय आश्रम शाळा सुद्धा सुरू होती. त्या शाळेत मुलांना निवास, भोजन, लेखन साहित्य, कपडे अशा सर्व सुविधा मिळत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेतीलपटामध्ये कमालीची घसरण होत गेली. कालांतराने शाळेचा पट शून्यावर आला. त्यामुळे शाळा बंद पडली. पुढे या विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण शासकीय आश्रम शाळेत होऊ लागले. परंतू पाच वर्षापूर्वी शासकीय आश्रम शाळेत सर्प दंशाने दोन मुले दगावल्यामुळे मुलांच्या सुरिक्षततेचा प्रश्न ऐरणीवर आला.ही बाब लक्षात घेत शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांनी पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांना तात्काळ शाळा सुरू करण्याचे आदेश निगर्मित केल्यावर १४ एप्रिल रोजीचे ज्ञानदिनाचे औचित्य साधून शिक्षणाधिकारी संगिता भागवत यांनी गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांना शालेय वातावरण निर्मितीचे आदेश देऊन संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. सोमवारी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामस्थ यांच्यासमवेत गावातील प्रवेश पात्र मुलांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन मुलांच्या पालकांचे उद्बोधन केले व आज ज्ञानिदन शिक्षण विभागाने आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करून एक वेगळा आदर्श घालून दिला.खरे पाहता ‘शिक्षणहक्क कायदा २००९’ ची अमलबजावणी करीत असलेल्या प्रशासनाने उशिरा पावले उचलली असली तरी सर्व स्तरावर या उपक्र माचे कौतुक होत आहे. लवकरच शाळा इमारत, डीजीटल शाळा, शासकीय योजना विद्यार्थ्यांना देऊन शिक्षण प्रक्रि या गतिमान करण्या विषयी शिक्षणाधिकारी भागवत यांनी केंद्र प्रमुख जाधव यांना मार्गदर्शन केले.