शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाकुर्लीत घंटागाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 00:37 IST

रहिवासी त्रस्त : कचरा संकलनाचे वाजले तीनतेरा

लोकमत न्यूज नेटवर्क डाेंबिवली : एकीकडे शून्य कचरा मोहिमेंतर्गत केडीएमसीकडून ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाचे धडे नागरिकांना दिले जात असताना, या कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या घंटागाड्या वाहनांचे वेळापत्रक कोलमडल्याने, गेल्या तीन ते चार दिवसांपासून कचरा संकलनाचे तीनतेरा वाजल्याचे चित्र ठाकुर्ली परिसरात पाहायला मिळत आहे. कचरा नेण्यासाठी नियमित गाडी येत नाही. त्यात ओला आणि सुका कचऱ्याचे ढिगारे गृहसंकुलाबाहेर जमा होत असल्याने दुर्गंधीचा त्रासही सहन करावा लागत आहे.

केडीएमसीने गृहनिर्माण संकुलांपाठोपाठ आता हॉटेल, मॉल, मार्केट आणि लग्नाचे हॉल यांनाही त्यांच्या कचऱ्यावर प्रकिया करणे बंधनकारक केले आहे. दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन राबविण्यासाठी नागरिकांना ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण करून देणे बंधनकारक केले आहे. महापालिकेच्या आवाहनानंतर, तसेच दंडात्मक कारवाईच्या इशाऱ्यानंतर का होईना, नागरिकांकडून ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. 

ठाकुर्ली परिसरातील कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता, तसेच ९० फिट रोडवरील गृहसंकुलात राहणाऱ्या रहिवाशांकडूनही कचरा वर्गीकरणाचे नियम काटेकोर पाळले जात आहेत, परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून कचरा नेण्यासाठी येणारी वाहने फिरकलीच नाहीत. त्यामुळे ओला कचरा घरातच जैसे थे पडून आहे. त्याचबरोबर, सुक्या कचऱ्याच्या संकलनाचेही तीनतेरा वाजले आहेत. कचऱ्याची वाहतूक करणारी वाहने केव्हा येतील, या प्रतीक्षेत काही गृहसंकुलांच्या बाहेर डब्यांमध्ये साचलेला हा कचरा गेले चार दिवस तसाच पडून आहे. यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शनिवारी गाडी आली होती, परंतु रविवारी आली नाही. 

परिणामी, ओल्या कचऱ्यासह सुका कचराही जैसे थे पडून असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, या संदर्भात केडीएमसी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

आयुक्तांनी लक्ष घालावेएकीकडे कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक केले असताना, त्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे, परंतु कचरा वाहून नेणारी वाहनेच दोन ते तीन दिवस येत नाहीत, हे चुकीचे असून, तातडीने महापालिका आयुक्तांनी यात लक्ष घातले पाहिजे.    - लक्ष्मण इंगळे,     सचिव, सर्वाेदय लीला संकुल