शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त भागाला पाणी मिळाले पण रसायनयुक्त

By admin | Updated: May 5, 2017 05:45 IST

येथील पाणीटंचाईबाबत ‘प्रशासनाने केले एप्रिल फूल’ या मथळ्याखाली लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तामुळे तालुक्यासह जिल्हा

मुरबाड : येथील पाणीटंचाईबाबत ‘प्रशासनाने केले एप्रिल फूल’ या मथळ्याखाली लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तामुळे तालुक्यासह जिल्हा प्रशासन हादरले असून त्यांनी तत्काळ मुरबाड तालुक्यातील टंचाईग्रस्त भागांत पाणीपुरवठा करण्यासाठी दोन टँकर तैनात केले. मात्र, ते टँकर रसायनयुक्त असून भंगारातीलच वाटत असल्याने या भंंगार आणि रसायनयुक्त टँकरच्या दूषित पाण्याने गावात किंवा परिसरात दुर्घटना होण्याचा धोका आहे. त्यामुळे तातडीने कार्यवाही होऊन पाणी मिळाले म्हणून आनंद मानावा की, रसायनयुक्त पाणी मिळाल्याचे दु:ख करावे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तालुक्यातील म्हाडस, बांधिवली, पाटगाव, गेटाचीवाडी, तागवाडी, मोहघर, तुळयी, साकुर्ली, वाल्हिवरे, झाडघर, न्याहाडी, किसळ, तोंडळी, सासणे या गावांसह ५१ गावांमध्ये डिसेंबरपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने १ एप्रिलपासून टँकर पुरवण्याचे आदेश दिले. मात्र, जवळपास महिनाभर यावर काहीच कार्यवाही झाली नाही. याबाबत, वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाने पाण्याची सोय तर केली, पण ते देखील रसायनयुक्त. या टँकरने आलेले पाणी प्रथम अधिकारीवर्गाने प्यावे. या पाण्यावर तहान भागवण्यापेक्षा आम्हाला डबक्यातील पाणीच बरे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.नागरिकांची तहान भागवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस काढून नोंदणीकृत पात्र ठेकेदारांकडून निविदा मागवून मगच या ठेकेदाराची निवड केलेली आहे. तरीही, जर असे रसायनयुक्त टँकरने पाणी मिळत असेल, तर हे पाणी शुद्ध की दूषित, याची खात्री कोण करणार, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. (वार्ताहर)या पाणीपुरवठ्यासंदर्भात आमच्याकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. ठेकेदाराची निवड जिल्हाधिकारी कार्यालयाने केली आहे. शिवाय, प्रत्येक टँकरमध्ये जीपीएस युनिट बसवले आसल्याने त्या टँकरची स्थिती पाहावयास मिळते.- नारायण राऊत, जि.प. पाणीपुरवठा विभाग, कार्यकारी अभियंताआमचे टँकर हे जरी रसायनयुक्त असले तरी ते सफाई करून आणलेले आहेत. त्यामुळे या टँकरने दूषित पाणीपुरवठा होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तसेच ही वाहने जरी जुनी असली तरी आरटीओच्या नियमांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होत नाही. तसा जिल्हाधिकारी कार्यालयाशी करारनामा केलेला आहे. - जगधने, पाणीपुरवठा ठेकेदार