शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

महसूल, भूमी अभिलेखच्या 57 लाख दस्तऐवजांचे स्कॅनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 23:35 IST

ठाणे जिल्हा : दोन लाख मिळकतींचे ई-फेरफार लवकरच

सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महसूल, भूमी अभिलेखच्या ५७ लाख नऊ हजार ४७१ दस्तऐवजांच्या स्कॅनिंगचे काम पूर्ण झाले आहे. तर मालमत्ता, शेतीवाडीच्या एक लाख ८१ हजार ७४१ मिळकतींचे लवकरच ई-फेरफार आणि डिजिटलायझेशन शेतकऱ्यांसह विकासकांना उपलब्ध होणार आहे. यासाठी जिल्ह्यात संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागलेली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. या कामाचा आढावाही नुकताच घेतल्याचे त्याने निदर्शनात आणून दिले.

जिल्ह्यातील तालुक्यात उपअधीक्षक, भूमी अभिलेखचे सहा कार्यालये व नगर भूमापन अधिकाऱ्यांचे दोन आदी आठ कार्यालयांचे १२ लाख ८६ हजार ८९१ नकाशे, दस्तऐवज आहेत, तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल खात्याचे ४४ लाख २२ हजार ५८०, महसुली कागदपत्रांचे ५७ लाख नऊ हजार ४७१ महत्त्वाची कागदपत्रे, नकाशे आदी दस्तऐवज नुकताच स्कॅनिंग करण्यात आला आहे. 

महसूल विभाग आणि भूमी अभिलेख खात्याचे अत्याधुनिकीकरणाच्या दृष्टीने या कागदपत्रांच्या स्कॅनिंगचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे.राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाद्वारे या महत्त्वाच्या कागदपत्रांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. यासह ई-फेरफार तसेच शेती, बिनशेतीच्या नकाशांचे डिजिटलायझेशन करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. यानुसार, जिल्ह्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख व नगर भूमापन अधिकारी आदी आठ कार्यालयांत ‘ईपीसीआयएस’ संगणक प्रणालीमध्ये या एक लाख ८१ हजार ७४७ मिळकतपत्रिकांचे अद्ययावतीकरण केले आहे.

प्रिंटआउट तपासणी पूर्णमिळकतपत्रिकांंच्या डाटा एडिटिंगचे व प्रिंटआउट काढून तपासणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सध्या मिळकतपत्रिकेवर ऑनलाइन डिजिटल साइनचे काम पूर्ण झाले आहे. आता लवकरच ऑनलाइन फेरफार उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डिजिटलायझेशनसाठी तीन गावांची निवडजिल्ह्यात फाळणी व इतर नकाशांवर बेसलाइन व ऑफसेट टाकून कच्चे टिपण तयार करून फाळणी नकाशे, पोटहिस्सा नकाशे, भूसंपादन नकाशे, ई-फेरफार आता उपलब्ध होणार आहेत. कोलाब्लॅड आज्ञावलीमध्ये डिजिटलायझेशनसाठी जिल्ह्यातील ठाणे परिसरातील मौजे नवघर, बेतवडे, डोमखार या गावांची निवड करण्यात आली आहे.