शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

सावित्रीबाई फुले कलामंदिरातील बेसमेंट सिमेंट, विटांनी ‘पॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 01:43 IST

प्रवेशद्वाराला ठोकले टाळे, कडेकोट बंदोबस्त

डोंबिवली : पूर्वेतील सावित्रीबाई फुले कलामंदिरातील बेसमेंटमध्ये विधानसभानिहाय मतदानयंत्रे ठेवली आहेत. हे बेसमेंट पूर्णपणे सिमेंट, विटा लावून बंद केले आहे. तर, एकमेव प्रवेशद्वारही मोठे कुलूप लावून तेही बंद केले आहे.

बेसमेंटच्या चारही बाजूंना कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. बेसमेंटच्या मुख्य भागात केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या केंद्रीय राखीव दलाचे पोलीस (सीआरपीएफ) तैनात करण्यात आले आहेत. चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. इतकेच नव्हे तर ज्या स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवल्या आहेत, तिथे आयोगाच्या निर्देशांनुसार कुठल्याही प्रकारची वायरिंग नाही. म्हणजे, हे बेसमेंट अंधारात राहणार आहे. आतमध्ये लाइटही लावलेले नाही.

बेसमेंटमध्ये विधानसभानिहाय तयार केलेल्या खोल्यांना तिजोरीसारखे दरवाजे लावण्यात आले आहेत. २३ मे रोजी क्रीडासंकुलातील बंदिस्त क्रीडागृहात मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत या स्ट्राँगरूममध्ये कडेकोट बंदोबस्तात मतदानयंत्रे व व्हीव्हीपॅट मशीन ठेवण्यात येणार आहेत.

कोणाला घेता येणार सुरक्षेचा आढावा?फुले कलामंदिरातील ज्या स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत, त्या परिसरात कुणालाही जाण्याची परवानगी नाही.परंतु, लोकसभा निवडणुकीतील उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना ईव्हीएम सुरक्षित आहेत किंवा नाही, याचा आढावा घ्यायचा असेल, तर त्यांना ते पाहता येऊ शकेल. मात्र, त्यासाठी रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी येथे एक लॉगबुकही ठेवलेले आहे.

अधिकारी स्वत: हजरफुले कलामंदिरातील बेसमेंटमध्ये स्ट्राँगरूमची व्यवस्था आहे. सर्व कंटेनर आल्यावर त्यातील ईव्हीएम काढून ते स्ट्राँगरूममध्ये बुथनिहाय लावून घेण्यात आले. ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालली. यावेळी कल्याण लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी कादबाने हे स्वत: हजर होते. यासोबतच सर्व विधानसभांचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या देखरेखीखाली सर्व ईव्हीएम व्यवस्थित ठेवून स्ट्राँगरूमची सुरक्षा सीआरपीएफच्या ताब्यात दिली.

टॅग्स :ElectionनिवडणूकdombivaliडोंबिवलीSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुले