शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शौचालयाशेजारी सावरकरांचे शिल्प; मनसेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 00:35 IST

नाहक राजकारण सुरू असल्याची नगरसेवकाची टीका

ठाणे : सावरकरनगर येथे नगरसेवक निधीतून बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाशेजारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भित्तीशिल्प साकारणे म्हणजे एकप्रकारे महापुरुषाची विटंबनाच नव्हे का, अशी टीका मनसेने केली आहे. सावरकरांचा अपमान करण्याचा आमचा उद्देश नसून हे भित्तीशिल्प मूळ जागेवरून हलविण्यात येणार आहे. मनसे स्वा. सावरकरांच्या नावावर राजकरण करीत असल्याचा प्रत्यारोप स्थानिक नगरसेवकाने केला आहे.श्री आई माताजी चौक, सावरकरनगर येथे काही वर्षांपूर्वी नगरसेवक निधीतून शौचालयाचे व मुतारीचे बांधकाम झाले आहे. त्याच्या शेजारीच असणाऱ्या मोकळ्या जागेचे प्रभाग सुधारणा निधीतून सुशोभीकरण सुरू आहे. परंतु, सुशोभीकरणाच्या नावाखाली त्या ठिकाणी स्वा. सावरकर यांचे भित्तीशिल्प लावण्यात आले आहे. सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला अशा प्रकारे महापुरुषांचे शिल्प साकारणे म्हणजे एकप्रकारे विटंबनाच नव्हे का, असा प्रश्न मनसे शाखाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी महापालिकेला निवेदन दिले आहे. स्वा. सावरकर हे हिंदुस्थानची अस्मिता असून त्यांची अशा प्रकारची विटंबना एक सावरकरप्रेमी म्हणून आम्ही सहन करणार नाही, असे कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे.सावरकरनगर येथील या सार्वजनिक शौचालयाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भित्तीशिल्प आम्ही मूळ जागेतून हलवून दुसºया जागी लावणार आहोत. मनसेला ही जागा हडपायची होती, म्हणून ते हा आरोप करीत आहेत. - दिलीप बारटक्के, स्थानिक नगरसेवक