शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांची नाटके म्हणजे शक्तिपीठे

By admin | Updated: April 23, 2017 04:07 IST

सावरकरांनी साहित्याच्या सर्व प्रकारांत लेखन केले असले, तरी नाटके खूपच कमी लिहिली. उ:शाप, संन्यस्त खड्ग, उत्तरक्रिया ही तीन आणि बोधिवृक्ष हे नाटक

ठाणे : सावरकरांनी साहित्याच्या सर्व प्रकारांत लेखन केले असले, तरी नाटके खूपच कमी लिहिली. उ:शाप, संन्यस्त खड्ग, उत्तरक्रिया ही तीन आणि बोधिवृक्ष हे नाटक मात्र त्यांनी अर्धवट लिहिले. अर्थात, साडेतीन नाटके त्यांनी लिहिली. मात्र, ज्याप्रमाणे धार्मिक क्षेत्रात साडेतीन शक्तिपीठे आहेत, त्याचप्रमाणे सावरकरांनी लिहिलेली ही नाटके म्हणजे नाट्यसृष्टीतील साडेतीन शक्तिपीठे आहेत, असे मत रंगकर्मी, लेखक प्रमोद पवार यांनी व्यक्त केले.गडकरी रंगायतन येथे सुरू असलेल्या एकोणतिसाव्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनात ‘सावरकरांचे साहित्य विश्व’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. त्या वेळी पवार बोलत होते. सावरकरांची नाटके मनोरंजनापलीकडची आहेत. आज रंगभूमीवर अनेक नाटके येतात. मात्र, त्यातील किती नाटके वैचारिक आहेत, समाजाला उपदेश देणारे किती लेखक आहेत, याचा विचार करण्याची गरज आहे. हे संमेलन म्हणजे सावरकरांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न असून त्याला आपण सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे, असे ते म्हणाले. सावरकरांची नाटके नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून ती रंगमंचावर कमीतकमी खर्चात पुनरुज्जीवित करण्याची इच्छा व्यक्त करत आयोजकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पवार यांनी केले. भारतकुमार राऊत या परिसंवादाचे अध्यक्ष होते. ते म्हणाले की, सावरकरांच्या मनात धगधगते विचार, स्वातंत्र्याची ऊर्मी होती. त्याच्यासाठी त्यागाची तयारी होती आणि हे शब्दबद्ध करण्यासाठी त्यांनी साहित्यनिर्मिती केली. त्यांचे साहित्यविश्व पाहिले, तर प्रतिभेची भरारी लक्षात येते. शब्द त्यांच्या प्रतिभेचे दूत होते. मात्र, ते प्रतिभेचे कधीच गुलाम झाले नाहीत, असेही राऊत या वेळी म्हणाले. सावरकरांचे साहित्य विश्व खूप मोठे आहे. त्यांच्यावर तत्कालीन आणि त्यांच्या मरणानंतर आलेल्या सरकारनेही अन्याय केला. डॉ. शरद हेबाळकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. संमेलनाच्या सायंकाळच्या सत्रात वसंत आजगावकर, डॉ. सच्चिदानंद शेवडे, नागेश कांबळे, शैलेंद्र गौड, चंद्रकला कदम, दामोदर नेने, मधुकर ताम्हाणे, शंकर गोखले यांचा सावरकरव्रती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)सदानंद मोरे अनुपस्थितया परिसंवादाचे अध्यक्षस्थान प्रा. सदानंद मोरे भूषवणार होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते अनुपस्थित होते.