शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

सौरभ साहूला दिल्लीतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 06:06 IST

बेकायदेशीर सीडीआर प्रकरणातील प्रमुख आरोपी सौरभ साहू याला ठाणे पोलिसांनी अखेर रविवारी दिल्लीतून अटक केली.

ठाणे : बेकायदेशीर सीडीआर प्रकरणातील प्रमुख आरोपी सौरभ साहू याला ठाणे पोलिसांनी अखेर रविवारी दिल्लीतून अटक केली. मोबाइल फोनचे सीडीआर बेकायदेशीरपणे काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने जानेवारी २०१८ मध्ये केला होता. या प्रकरणामध्ये देशातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह १६ आरोपींना आतापर्यंत अटक केली. आरोपींमध्ये ११ खासगी गुप्तहेरांसह यवतमाळ येथील एका पोलीस शिपायाचाही समावेश आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे नाव आल्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत होते. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या बहुतांश आरोपींना दिल्लीच्या सौरभ साहूने बेकायदेशीररीत्या सीडीआर पुरवल्याचा आरोप आहे. आरोपींच्या चौकशीतून तशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे सौरभच्या अटकेसाठी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू होते. त्याच्या अटकेसाठी आतापर्यंत चारवेळा ठाणे पोलिसांचे पथक दिल्लीला जाऊन आले. त्याच्या नातलगांकडेही चौकशी केली. मात्र, पोलिसांच्या पदरी निराशा आली. Þकेंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यासह काही बडे नेते आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे सीडीआर काढल्याचा आरोप असलेल्या दिल्लीच्या पंकज तिवारीलाला पोलिसांनी मे महिन्यात अटक केल्यानंतर सौरभच्या अटकेची शक्यता वाढली होती. त्याची ठोस माहिती मिळाल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांचे पथक दोन दिवसांपूर्वी दिल्लीला रवाना झाले होते. तो गाझियाबादच्या घरी असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी रात्री पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. त्याला २०१६ मध्ये दिल्ली पोलिसांनी, तर २०१७ मध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली. सोमवारी ठाणे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.>महत्त्वाची उकलसौरभ साहूच्या अटकेने सीडीआर प्रकरणाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्यांची उकल करणे पोलिसांना शक्य होईल. सौरभ फरार असल्याने पोलिसांचा तपास पुढे सरकत नव्हता. त्याला अटक झाल्याने तो मोबाइल कंपन्यांकडून सीडीआर कसा मिळवायचा, कोणकोणत्या पोलीस अधिकाºयांच्या ई-मेलचा त्याने वापर केला, त्याचे साथीदार कोणकोण आहेत, अशा असंख्य प्रश्नांचा उलगडा पोलिसांना करता येणार आहे.मोठ्या प्रमाणात सीडीआरची विक्रीवेगवेगळ्या शहरांमधील गुप्तहेर सौरभच्या संपर्कात होते. त्यांच्याशी सीडीआर विक्रीचा सौदा तो अक्षरश: घाऊक भावात करायचा. कुणालाही जास्त प्रमाणात सीडीआर हवे असतील, तर तो एकाचवेळी पुरवायचा. त्यामुळे सीडीआर मिळवण्यासाठी सौरभने तयार केलेल्या साखळीत नेमके कोणकोण आहे, हे पोलीस आता तपासून पाहणार आहेत.