शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा झाला आॅनलाइन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 02:34 IST

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील एक हजार ९५३ गावांतील शेतकऱ्यांना आॅनलाइन डिजिटल सातबारा देण्याचे काम सुरु झाले

सुरेश लोखंडेठाणे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील एक हजार ९५३ गावांतील शेतकऱ्यांना आॅनलाइन डिजिटल सातबारा देण्याचे काम सुरु झाले आहे. या गावांपैकी अंबरनाथ तालुक्यातील बांदणवाडीतील शेतकºयांचे १०० टक्के डिजिटल सातबारा आॅनलाइन झाला असून त्यांच्या वितरणाचा प्रारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १ मे रोजी करण्यात आले.जिल्हाभरात सुमारे एक लाख ७० हजार ६५६ खातेदार शेतकरी आहेत. यामध्ये एक हेक्टरपर्यंतच्या अत्यल्प भूधारक शेतकºयांपासून ते दोन हेक्टरपर्यंतचे अल्पभूधारक, चार हेक्टरपर्यंतचे लघु, मध्यम, मध्यम भूधारक १० हेक्टरपर्यंत आणि मोठे शेतकरी १० हेक्टरपेक्षा जास्त शेती असलेल्या शेतकºयांचा जिल्ह्यात समावेश आहे. जिल्हाभरातील एक हजार ९५३ गावांमधील शेतजमिनींचे सातबारा आॅनलाइन डिजिटल करण्याचे काम काही महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. सद्य:स्थितीला १०० टक्के डिजिटल सातबारा अंबरनाथच्या बांदणवाडी या महसुली गावातील शेतजमिनीचे तयार झाल्याची माहिती या योजनेचे काम हाताळणारे उपजिल्हाधिकारी जलसिंग वळवी यांनी ‘लोकमत’ला दिली. या आॅनलाइन डिजिटल मोडच्या दृष्टीने एक हजार ९५३ महसुली गावांपैकी आतापर्यंत ८९८ गावांतील शेतजमिनीच्या डिजिटल सातबाºयांसाठी घोषणा प्रपत्र-३ पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित एक हजार ५५ गावांचे काम अर्धवट असल्याच्या वृत्तास वळवी यांनी दुजोरा दिला आहे. या योजनेच्या सातबारा वितरणास शुभारंभ झाला असला, तरी १०० टक्के काम पूर्ण होण्यास आणखी कालावधी लागणार आहे.