शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्या १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 02:17 IST

अंबरनाथमधील घटना : माहेरच्या मंडळींना केली मारहाण

अंबरनाथ : मूळच्या पनवेलमधील घोट गावातील तरुणीचा बुर्दल गावातील तरुणासोबत विवाह झाला होता. विवाह झाल्यावर लागलीच सासरच्यांनी या विवाहितेचा पैशांसाठी छळ सुरू केला. तसेच स्त्रीधन म्हणून आणलेले दागिने स्वत:च्या ताब्यात ठेवले. पैसे न आणल्यास मारहाणही केली जात होती. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या माहेरच्यांनाही मारहाण केली. या प्रकारानंतर या विवाहितेने पोलीस ठाण्यात धाव घेत सासरच्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

दीपा महेश पाटील हिचा विवाह ११ मे २०१९ रोजी पनवेलच्या घोट गावात झाला. लग्नानंतर लागलीच तिचा सासरच्यांनी छळ सुरू केला. पती महेश हा तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. लग्नानंतर स्त्रीधन म्हणून आलेले दागिने तिच्या ताब्यातून घेतले. सरासरी २१ तोळे सोने सासरच्यांनी स्वत:च्या ताब्यात ठेवत दीपाला माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला. लग्नाला महिनाही झालेला नसताना त्यांचा हा त्रास सुरू झाला होता. पती महेश हा तिच्यावर नेहमी संशय घेऊन तिला मारहाण करायचा.

सासरच्या मंडळींकडून नेहमीच तिच्याकडून कोणत्या ना कोणत्या वस्तूची मागणी केली जात होती. त्यानंतर, त्यांची हाव एवढी वाढली की, त्यांनी थेट माहेरहून १० लाख आणण्यासाठी हट्ट धरला. हे पैसे न आणल्याने त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. १२ डिसेंबरला पती महेशने दीपाला पैसे आणत नाही म्हणून पट्ट्याने मारहाण केली. हा त्रास अनावर झाल्याने तिने आपल्या घरच्यांना हा प्रकार सांगितला.दीपाचे घरचे आल्यावर त्यांनाही मारहाण करण्यात आली. या सर्व प्रकाराची नोंद हिललाइन पोलीस ठाण्यात करण्यात आली. मात्र, हा प्रकार गंभीर असल्याने दीपा हिने सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. दीपाचे सासरचे लोक हे सातत्याने तिचा छळ करत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती महेश पाटील, सासरा शांताराम पाटील, सासू प्रेमा पाटील यांच्यासह जयेश पाटील, पूजा पाटील, योगेश पाटील, चिंतामण पाटील, कांता पाटील, रामदास पाटील, सुगंधा पाटील, लालचंद पाटील, कविता पाटील, नीरा पाटील, नितीन पाटील आणि जतीन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एकाही आरोपीला अटक नाहीगुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले, तरी अद्याप एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही. आरोपींना अटक होत नसल्याने दीपा आणि तिच्या कुटुंबीयांनी सहायक पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :thaneठाणे