शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाला बोगस दाखला प्रकरण भोवले, सरपंचपदावरून पायउतार होण्याची नामुश्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:52 IST

वडिलोपार्जित जमिनीचे बोगस हक्कसोड प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी नढई ग्रामपंचायतीचे वादग्रस्त सरपंचपद उच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द करण्यात आले.

मुरबाड : वडिलोपार्जित जमिनीचे बोगस हक्कसोड प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी नढई ग्रामपंचायतीचे वादग्रस्त सरपंचपद उच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द करण्यात आले. यामुळे दोन वेळा सरपंचपदावरून पायउतार होण्याची नामुश्की त्यांच्यावर ओढवली असून मुरबाडमधील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. उच्च न्यायालयाचा हा निकाल राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या निकालाविरोधात आहे.नढई ग्रामपंचायतीच्या सरपंच पद्मा टोहके यांनी टेंभरे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मृत गौरूबाई शंकर केंबारी, नढई येथील रहिवासी असल्याचा आणि आपण त्यांना ओळखत असल्याचा दाखला दिला होता. हा दाखला देताना आपला दीर शिवाजी गोविंद टोहके यांच्या सासूबाई भागीरथी पदू दिनकर यांचा फोटो लावून खोट्या सहीने दाखला दिला होता. या दाखल्याचा उपयोग ७/१०/२०१३ रोजी दुय्यम निबंधक मुरबाड यांच्याकडे हक्कसोड नोंदणीसाठी वापरण्यात आला होता. मात्र, वापरलेला हा दाखला खोटा असल्याची तक्र ार भाऊ बुधाजी टोहके व संतोष नामदेव टोहके यांनी विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्याकडे २४/ ६/२०१६ रोजी लेखी तक्र ार केली होती. या तक्र ारीत सरपंच पद्मा रमेश टोहके यांनी टेंबरे ग्रामपंचायत हद्दीत सासर आणि नढई या गावात माहेर असताना सरपंच म्हणून नात्याने पतीची आत्या असलेल्या मृत व्यक्ती गौरूबाई शंकर केंबारी यांना रहिवासी असल्याचा दाखला संगनमताने दिल्याची तक्र ार केली. या तक्र ारीची दखल घेत कोकण आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून सरपंचांनी दिलेला दाखला खोटा असल्याचे निष्पन्न केले. या कामी दोषी असलेल्या सरपंच टोहके यांना सरपंचपदावरून निलंबित केल्याचा निर्णय दिला. या निर्णयावरून सरपंच टोहके यांना सरपंचपद सोडावे लागले. मात्र, आयुक्तांनी दिलेला निर्णय सरपंच टोहोके यांना मान्य नसल्याने टोहके यांनी ग्रामविकास मंत्रालय, मुंबईच्या न्यायालयात झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी अपील केले. ग्रामविकास विभागाने याची चौकशी करून आयुक्तांचा निकाल रद्दबातल करून सरपंच टोहोके यांना सरपंचपदी राहण्याचा निर्णय दिला. यामुळे टोहके हे पुन्हा एकदा सरपंचपदी विराजमान झाले. मात्र, प्रतिवादी भाऊ बुधाजी टोहके आणि संतोष नामदेव टोहके यांना हा निर्णय मान्य नसल्याने त्यांनी या विरोधात हायकोर्टात अपील केले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत