शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, ग्रामसेवकास लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:21 IST

घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शहापूर तालुक्यातील एका सरपंचासह ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शहापूर तालुक्यातील एका सरपंचासह ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ अटक केली.शहापूर तालुक्यातील खरवली ग्रामपंचायतीकडे एका ग्रामस्थाचा पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभाचा दुसरा हप्ता थकीत होता. यासाठी या ग्रामस्थाने ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला असता सरपंच यशवंत सोनू वाघ आणि ग्रामसेवक रमेश माधव सासे यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी केली. ग्रामस्थाने याबाबत ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पोलीस उपअधीक्षक अंजली आंधळे यांनी तक्रारीची शहानिशा केली असता आरोपींनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, आरोपींच्या अटकेसाठी सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे सोमवारी तक्रारदार ग्रामस्थ २० हजार रुपये लाच घेऊन गेले. या वेळी त्यांच्याकडून लाच स्वीकारताना आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली. याप्रकरणी सरपंच यशवंत सोनू वाघ आणि ग्रामसेवक रमेश माधव सासे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अंजली आंधळे करीत आहेत.