शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

पारसिक चौपाटीचे स्वप्न जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 16:48 IST

येत्या जूनअखेर पर्यंत पारसिक चौपाटीचे स्वप्न साकार केले जाईल असे आश्वासन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहे. सोमवारी त्यांनी सुरु असलेल्या कामांचा पाहणी दौरा केला.

ठळक मुद्देपारसिक चौपाटीचे काम युध्द पातळीवरगावदेवी उद्यानाखाली पार्कींग सुविधा उपलब्ध करण्यासाठी चाचपणी

ठाणे - कळव्यातील पारसिक चौपाटी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या जूनअखेरपर्यंत ठाणेकरांचे चौपाटीचे ऐतिहासिक स्वप्न पूर्ण होणार असल्याचे आश्वासन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहे. तसेच स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत पर्यायी व्यवस्था करण्याबाबत महापालिका पावले उतलण्यास सुरूवात झाली असून त्याबाबतही लवकरच ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.                   सोमवारी सकाळपासून जवळपास ५ तास आयुक्तांनी विविध प्रकल्पांची, रस्त्यांची, पारसिक चौपाटी आणि स्टेशन परिसराची झाडाझडती घेतली. यावेळी स्टेशन येथे त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त (१) सुनील चव्हाण, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. सकाळी १० वाजता महापालिका आयुक्तांनी घोडबंदर रोडपासून आपल्या पाहणी दौºयास सुरूवात केली. पोखरण रोड नं. ३, टिकुजिनी वाडी, ग्लॅडी अल्वारीस मार्ग, गांधीनगर चौक, पोखरण रोड नं. २ या रस्त्यांची पाहणी करून त्यांची कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश नगर अभियंता अनिल पाटील यांना दिले. त्याचवेळी त्यांनी गांधीनगर ते शिवाईनगर चौकपर्यंत सुरू असलेल्या सायकल ट्रॅकच्या कामाची पाहणी करून या सायकल ट्रॅकचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच व्होल्टास कंपनी येथील नाल्यावरील पूलाची रूंदी वाढविण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.पोखरण रोड नं. २ पासून घाणेकर नाट्यगृहपर्यंत जाणाºया रस्त्याच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त करून या रस्त्यामध्ये येणारे प्रार्थना स्थळ स्थलातंरीत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानंतर आयुक्तांनी पारिसक चौपाटीच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच चौपाटीला जोडून तयार करण्यात येत असलेल्या सेवा रस्त्याच्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. येत्या जूनअखेरपर्यंत ठाणेकरांचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी नगर अभियंता आणि संबंधित ठेकेदाराला दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत उपायुक्त संदीप माळवी, शहर विकाय व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, सुधीर गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते.दरम्यान स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अतिरिक्त आयुक्त (१) सुनील चव्हाण, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांच्यासह स्टेशन परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी गावदेवी मैदानातील भुयारी वाहन तळाबरोबरच गावदेवी उद्यानामध्येही भूयारी वाहनतळ सुरू करता येईल का याची चाचपणी करण्याच्या सूचना दिल्या तसेच गावदेवी मैदान येथे सायंकांळी ६ ते १० या वेळेत तात्पुरती पार्कींग व्यवस्था करता येईल का ही शक्यताही पडताळून पाहण्यास सांगितले. त्याचप्रमाणे स्टेशन परिसरातील रिक्षांसाठी पर्यायी मार्गिका काढता येवू शकते का याबाबतही पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त