शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी संजय जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:43 IST

बदलापूर : बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी संजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे. बदलापूर शहरातील मरगळलेली काँग्रेस पुनर्जीवित ...

बदलापूर : बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी संजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे. बदलापूर शहरातील मरगळलेली काँग्रेस पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न जाधव यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. बदलापूर शहरात इतर पक्षांच्या तुलनेत काँग्रेसची ताकद कमी असल्याने आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

काँग्रेसचे माजी ब्लॉक अध्यक्ष प्रकाश घोलप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या ब्लॉक अध्यक्षपदी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते संजय जाधव यांची निवड जाहीर केली आहे. जाधव यांच्या माध्यमातून बदलापूर शहरात सुशिक्षित चेहरा देण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. जाधव यांच्या निवडीसोबतच ब्लॉगच्या कार्याध्यक्षपदी लक्ष्मण कुडव आणि रंजन एडवांकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी निवडणुकीत नगरपालिकेच्या सत्तास्थापनेत काँग्रेस किंगमेकर ठरेल, असे मत संजय जाधव यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी सन्मानपूर्वक वागणूक दिली तर आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवू अन्यथा आगामी पालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

--------------------