शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी उद्यानातील जंगल पेटले; वनविभागाचे अधिकारी फिरकलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 23:54 IST

काशिमीराच्या माशाचापाडाजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रविवार सकाळपासून जंगलाने पेट घेतला आहे. त्यामुळे वन्यजीवांची होरपळ व पळापळ सुरू आहे.

मीरा रोड : काशिमीराच्या माशाचापाडाजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रविवार सकाळपासून जंगलाने पेट घेतला आहे. त्यामुळे वन्यजीवांची होरपळ व पळापळ सुरू आहे. आग भडकत चालली असून ती आटोक्यात आणली नाही, तर मोठ्या प्रमाणात जंगल भस्मसात होण्याची भीती आहे. आगीबाबत अनेकवेळा कळवूनही वनविभागातून कुणी अधिकारी, कर्मचारी फिरकला नाही. त्यामुळे या आगीत भूमाफियांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अग्निशमन दलानेही आपले हात झटकले.माशाचापाडाजवळ असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील डोंगरावर आग भडकल्याची माहिती दुपारी १२ च्या सुमारास जवळच्या वसाहतीत राहणारे मनसेचे पदाधिकारी सचिन जांभळे यांना मिळाली. जांभळे यांनी आपले सहकारी अमित दास, इरफान बिनदिनीफ यांच्यासह जंगलाकडे धाव घेतली. ही आग सकाळी १० पासून लागल्याचे त्यांना कळले. जांभळे यांनी याबाबत वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९०६ वर अनेकवेळा संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाच्या १०१ क्रमांकावर संपर्क केला असता जंगलातील आग विझवायला आमच्याकडे यंत्रणा नसल्याचे सांगत त्यांना मीरा-भार्इंदर महापालिकेच्या सिल्व्हर पार्क अग्निशमन केंद्राशी संपर्क करा, असे सांगण्यात आले. सिल्व्हर पार्क अग्निशमन केंद्रातूनही कुणी फिरकले नाही.जांभळे व सहकाऱ्यांनीच आग वाढू नये, म्हणून प्रयत्न केले. पण, सुका पालापाचोळा व वाºयामुळे आग वेगाने पसरत चालली होती. काशिगाव येथील वनविभागाच्या कार्यालयात मदतीसाठी धाव घेतली असता तेथे टाळे लागले होते.वनअधिकारी सोनावणे, पवार आदींचा संपर्कच होत नव्हता. सकाळपासून आगीने मोठ्या प्रमाणात जंगल भस्मसात केले असून सायंकाळ झाली, तरी आग पसरत चालली होती. आगीमुळे वन्यजीव सैरावैरा पळत सुटल्याचे तसेच अनेक जीव आगीत भस्मसात झाल्याचे जांभळे यांनी सांगितले.दरम्यान, सिल्व्हर पार्क अग्निशमन केंद्रात विचारणा केली असता आधी आमची हद्द नाही, वनविभागाचे काम आहे, अशी कारणे सांगण्यात आली.भूमाफियांनी उभारलेल्या झोपड्यांवर कारवाई नाहीराकेश आंब्रे व जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण, आग मोठी असल्याने काही वेळातच जवान माघारी फिरले. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या परिसरातील जंगलास आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. या भागात भूमाफियांनी झोपड्या उभारल्या असून वनविभाग आणि महापालिका कारवाईच करत नाही. आणखी झोपड्या उभारण्यासाठी आगी लावून जंगल नष्ट करण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप मनसेचे सचिन जांभळे यांनी केला आहे.

टॅग्स :thaneठाणे