शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बांधकामांसाठी रेतीचे होणार स्वस्तात वाटप; दोन लाख ४८ हजार ५३३ ब्रास रेती वाटपाचा घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2023 11:48 IST

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध प्रकारच्या बांधकामांसाठी व मागेल त्यास स्वस्तात म्हणजे ६०० रुपये ब्रासने रेती वितरण करण्याचा निर्णय जाहीर झाला.

- सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य शासनाने जिल्ह्यात ६०० रुपये ब्रासने रेती वितरण करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल दोन लाख ४८ हजार ५३३ ब्रास रेती वाटप करण्याचा निर्णय घेऊन ई-निविदेद्वारे ही प्रक्रिया राबविण्याकरिता यंत्रणा सज्ज केली आहे. यासाठी खाडी व नदीचे सात लाख तीन हजार ३४० घनमीटर क्षेत्र पोखरण्यात येणार आहे. या रेती वाटपात सुसूत्रता आणण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडणार आहे.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध प्रकारच्या बांधकामांसाठी व मागेल त्यास स्वस्तात म्हणजे ६०० रुपये ब्रासने रेती वितरण करण्याचा निर्णय जाहीर झाला. त्यासाठी प्रारंभीच तब्बल दोन लाख ४८ हजार ५३३ ब्रास रेतीचे उत्खनन हाती घेण्यात आले आहे. गुरुवारी अधिकृत एजन्सीची निवडही करण्यात आली. 

सोमवारी बैठक घेऊन या रेती उत्खननासह डेपोपर्यंत होणारा पुरवठा व तेथून होणारे वितरण आदींविषयी खास आराखडा तयार करून त्यानुसार अंमलबजावणी करण्यासाठी चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे स्वस्तात रेती उपलब्ध होणार असल्यामुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्ह्यातील बांधकामांसाठी ही रेती उपलब्ध करून देण्याचे धोरण अवलंबिले आहे. रेतीचे उत्खनन, साठवण व ऑनलाइन वितरण करणारे डेपो सज्ज करण्यात आले आहेत. कल्याण आणि मोटागाव या दोन डेपोंवर दोन लाख ४८ हजार ५३३ ब्रास रेतीची साठवण होऊन ऑनलाइन वितरण करण्याचे निश्चित केले आहे. 

रेतीचे उत्खनन उल्हास नदी पात्र व कल्याण, मोटागाव खाडीतून करण्यासाठी मेरीटाइम बोर्डाने परवानगी दिली आहे. दोन डेपोंसाठी लागणारी रेती उल्हास नदी व खाडीपात्रातील सात लाख तीन हजार ३४० घनमीटर क्षेत्रातून उत्खनन केले जाणार आहे. या नदीपात्रातील आठ ठिकाणी या रेतीच्या उत्खननाच्या जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. उल्हास नदी पात्र ते कल्याण आणि डोंबिवली ते कल्याण या दोन घाटांतून या रेतीचे उत्खनन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

मोठागांव डेपोसाठी  ७४ हजार ३९४ ब्रास रेतीया डेपोसाठी उल्हास नदी पात्र व खाडीच्या दोन लाख दहा हजार ५३० घनमीटर परिसरातून रेतीचे उत्खनन होईल. आठ ठिकाणी होणाऱ्या या उत्खननातून ७४ हजार ३९४ ब्रास रेती काढण्यात येणार आहे.

कल्याण डेपोसाठी एक लाख ७४ हजार १३९ ब्रास रेतीडोंबिवली ते कल्याण या खाडी पात्रातील रेती घाटातून एक लाख ७४ हजार १३९ ब्रास रेती काढण्याचे निश्चित झाले आहे. आठ ठिकाणांच्या तब्बल चार लाख ९२ हजार ८१० घनमीटर क्षेत्रातून रेतीचे उत्खनन होऊन या डेपोपर्यंत वाहतूक करण्यात येणार आहे.